बिहारमधील एका बीटेक विद्यार्थीनीने हरियाणातील फरिदाबाद इथे आपले स्वप्न साकार करण्यासाठी चहाचे दुकान थाटले आहे. वर्तिका सिंग असं या विद्यार्थीनीचं नाव आहे. तिला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता, परंतु स्टार्टअप सुरू करण्यापूर्वी तिला आपली पदवी पूर्ण करण्यासाठी ४ वर्षे वाट पाहायची नव्हती. म्हणून तिने हळूहळू पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि ‘बी.टेक चहावाली’ नावाने स्वतःचं चहाचं दुकान सुरू केलं.

स्वॅग से डॉक्टर नावाच्या पेजवून हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये वर्तिका तिच्या चहाच्या स्टॉलबद्दल माहिती देताना दिसतेय आणि त्याबद्दल काही गोष्टी शेअर करताना दिसतेय. या व्हिडीओमध्ये वर्तिका म्हणाली की, तिने फरीदाबादमधील ग्रीन फील्डजवळ चहाचे दुकान उघडलं आहे आणि संध्याकाळी ५.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत ती तिचा स्टॉल लावते.

तिच्या या स्टॉलवर चहाचे विविध प्रकार ठेवले आहेत. मसाला आणि लिंबू चहा प्रत्येकी २० रूपयाला आणि नियमित चहा १० रूपयाला विकते. तिच्या दुकानात एक छोटा स्टोव्ह आहे ज्यावर अॅल्युमिनियमची किटली ठेवली आहे. तिच्या आजूबाजूला लोक गरमागरम चहाची वाट पाहत गप्पा मारताना दिसतात.

आणखी वाचा : रस्ता ओलांडणाऱ्या हत्तीला बाईकस्वार जवळजवळ धडकणारच होता…. पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : वर्गातच दोन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

हा व्हिडीओ आतापर्यंत ५६ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. सोशल मीडिया यूजर्सनी तिच्या जिद्द आणि मेहनतीचे कौतुक केले आहे. एका यूजरने लिहिले, “मला तुझी स्माईल आणि आत्मविश्वास खूप आवडतो. मी तुझ्यासाठी प्रार्थना करेन.” दुसर्‍या युजरने लिहिले की, “असंच चालू ठेवा, येत्या १ वर्षात तुम्ही एक ब्रँड व्हाल.” तिसर्‍याने लिहिले, “या धैर्याबद्दल तुमचा खूप आदर वाटतो.”

यापूर्वी एका अर्थशास्त्राच्या पदवीधराने बिहारची राजधानी पाटणा येथील एका महिला महाविद्यालयाजवळ चहाचा स्टॉलही लावला होता. त्याला दोन वर्षे नोकरी मिळाली नव्हती. तर २०१९ मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलेल्या प्रियंका गुप्ताने सांगितले की, “एमबीए चहावाला” या नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रफुल्ल बिलोरची कथा ऐकून तिला चहाचे दुकान उघडण्याची प्रेरणा मिळाली.