सोशल मीडियावर लाईक्स मिळवण्यासाठी अनेक जण जीव धोक्यात घालून व्हिडीओ बनवतात. यात जंगलातील साप हा व्हिडीओ बनवणाऱ्यांसाठी जणूकाही खेळणं झालं आहे. पण सापांसोबतचा खेळ कधी जीवावर बेतेल सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर सापाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात एक तरुणी मिलनात गुंग असलेल्या दोन सापांच्या शेपट्यांना अशी काही पकडते जणू काही ते रश्शी आहेत. या सापांनी दंश केला तर मृत्यू होईल, याची जराही भीती या तरुणीच्या चेहऱ्यावर दिसत नाही. हा थरारक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून नेटकऱ्यांनी या भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक धाडसी तरुणी मिलनात गुंग असलेल्या दोन भल्या मोठ्या सापांना न घाबरता रेस्क्यू करताना दिसत आहे. सामान्यत: सापांना रेस्क्यू करताना सर्पमित्रांच्या हातात काठी किंवा विशेष वस्तू असते ज्याद्वारे ते सापांना पकडतात आणि बॉक्समध्ये बंद करतात. पण या व्हिडीओमधील तरुणी हातात कोणताही काठी किंवा काही न घेताच रश्शी पडल्याप्रमाणे सापांना पकडत आहे. यावेळी पिसाळलेल्या अवस्थेतील साप तिला दंश करतात की काय अशी भीती वाटते, कारण ते त्याचप्रकारे तरुणीच्या शरीराबाहेर सळसळत असतात.

Viral Video Shows lion gripping a mans limbs
‘हे तुमच्या कर्माचे फळ…’ पिंजऱ्यातील पाळीव सिंहाने माणसावर केला हल्ला अन्… VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
snake bites disease
सर्पदंश हा आजार मानला जाणार? कारण काय? याला अधिसूचित आजार घोषित करण्याची मागणी केंद्राकडून का होत आहे?
US man reads with giant anaconda Snake shocking video Viral
बापरे! बिछान्यावर भल्यामोठ्या ॲनाकोंडा सापाला घेऊन झोपला अन्…; पाहा भयावह VIDEO
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
deadly fight going on between two highly venomous snakes Everyone shuddered to see this scene
व्हिडिओ: अत्यंत विषारी मण्यार सापांची थरकाप उडवणारी झुंज
snake entered tiger cage in British era Maharajbagh Zoo staff noticed it immediately and pulled snake out
वाघिणीच्या पिंजऱ्यात शिरला साप आणि आता मोराच्याही…
Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

दोन भल्या मोठ्या सापांना हाताने धरून ठेवले अन्…

या व्हिडीओमध्ये काळ्या रंगाचा टॉप आणि निळ्या रंगाची जीन्स घातलेली तरुणी दिसत आहे. ती एका नाल्याच्या वर उभी राहून सहज खाली डोकावते तेव्हा तिला दोन मोठे साप मिलनात गुंग असल्याचे दिसतात. यावेळी वाघाने झडप घालावी तशी ती त्या सापांवर झडप घालते आणि सापांच्या शेपटीला पकडते. यावेळी एका सापाची शेपटी तिच्या हातात येते पण दुसरा नाल्याच्या बाजूच्या छिद्रात शिरण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळी एका सापाला हातात तसाच पकडून ती दुसऱ्या हाताने दुसऱ्या सापाची शेपटीला पकडून बाहेर काढते. या सापांची लांबी बघून तुम्हालाही भीती वाटेल, पण ती तरुणी न घाबरता सापांना अगदी बिधास्तपणे रेस्क्यू करते.

या व्हिडीओला आत्तापर्यंत ५ लाखांहून अधिक व्हूज मिळाले आहेत. अनेकांनी कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिले की, ती सापांना घाबरत नाही कारण ती स्वत:च एक साप आहे. तर दुसऱ्याने लिहिले की, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणीही महिलांवर विनोद करण्याची हिंमत करणार नाही. तर तिसऱ्या युजरने कमेंट करत लिहिले की, ही तरुणी सापांना जबरदस्तीने त्रास देत आहे. ती त्यांना वाचवत नाही.

Story img Loader