मुंबईचा पाऊस म्हटला की, रोमँटिक वातावरणाबरोबरीनेच डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते रस्त्यावर साचलेल्या पाण्याचे. त्यामुळे कित्येकदा जोराचा पाऊस झालाच तर आपण या काळात बाहेर पडणेही टाळतो. पण हे झालं मुंबईकरांसाठी. परंतु कामानिमित्त मुंबईत आलेल्या परदेशी पाहुण्यांना कुठे याची कल्पना असते. अशाच प्रकारच्या प्रसंगाचा सामना अलीकडेच एका ऑस्ट्रेलियन महिलेला देखील करावा लागला होता. तिला पहाटे ३ वाजता परतीच्या प्रवासासाठी फ्लाईट पकडायचे होते. परंतु बाहेर कोसळणाऱ्या धो-धो पावसामुळे ते शक्य होईल असे तिला वाटले नाही. किंबहुना रस्त्यावरील साचलेले पाणी पाहता, आज आपले फ्लाईट चुकतंय अशीच कुणकुण तिला लागून राहिली होती. परंतु घडले वेगळेच तिच्या उबर ड्रॉयव्हरने भर पावसात मुंबईच्या रस्त्यावरून गाडी चालवत थेट त्या महिलेला वेळेत विमानतळावर पोहोचवले. त्यामुळेच तिने इंस्टाग्रामवरून या उबर ड्रॉयव्हरचे आभार मानले आहेत.
अधिक वाचा: तरुणाचा भलताच स्वॅग! पावसात शूज भिजू नये म्हणून केलं असं काही की, video पाहून पोट धरून हसाल
व्हिडिओ पहा:
व्हिडीओमध्ये तिच्या विमानतळापर्यंतच्या प्रवासाची काही झलक टिपण्यात आली आहे. तिच्या व्हिडीओमध्ये ब्री स्टेली म्हणतेय, “मला खात्री आहे की भारतीय हे जगातील कशावरही मात करू शकणारे आणि शांत लोक आहेत” आणि “हे फक्त भारतातच घडू शकतं!” …हो हे फक्त भारतातच घडू शकतं. संपूर्ण प्रवासात गाडीची चाकं पूर्णतः पाण्यात बुडालेली होती. पहाटेच्या अंधारात रस्त्याने गाडीला मार्ग दाखवणारे भर पावसात उभे होते. विमानतळावर पोहोचेपर्यंत मी पूर्ण भिजले होते. तरी आजूबाजूचे सर्व शांत होते. मी आता मुंबई सोडली आहे. पण मी नक्कीच परत येईन.
स्टीलने काही दिवसांपूर्वी व्हिडिओ शेअर केला होता. तेव्हापासून, या व्हिडिओला २२१,००० पेक्षा जास्त लाईक्स आणि २ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज आहेत. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले की, “तुम्ही जुलै महिन्यात मुंबईत असाल, तर तुम्ही किमान ३-४ तास अगोदर सर्व गोष्टींचे नियोजन केले पाहिजे. या काळात प्रचंड पाऊस असतो.”
अधिक वाचा: VIDEO: “हात न लावता भांडी कशी घासायची?” महिलेने गूगलला विचारलेले भन्नाट प्रश्न ऐकून पोट धरून हसाल
भारतात मुसळधार पाऊस आणि मान्सूनमुळे नासधूस होते आणि बरेच पाणी तुंबते, पूरही येतो; हे क्वचितच घडते, परंतु ते कोणत्याही प्रकारे धोकादायक नाही,” असे मत आणखी एकाने दिले. “मी एकदा उबर टॅक्सीतून मुंबई विमानतळावर पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना रडलो. भयंकर ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो आणि माझ्या ड्रायव्हरने सांगितले की कदाचित फ्लाईट चुकेल. मला अश्रू अनावर झाले होते. ते उबर ड्रॉयव्हरने पाहिले आणि प्रयत्नांची पराकाष्टा करून मला विमानतळावर पोहचवले” अशी प्रतिक्रिया आणखी एका युजरनने व्यक्त केली.
“मी मुंबईचा नाही आणि तुम्ही जे म्हणत आहात ते भारतीयांबद्दल खरे आहे, परंतु मी पाहिले आहे की विशेषत: मुंबईतील लोक एकमेकांना मदत करण्यास सदैव तत्पर असतात, कितीही वेळ असो आणि परिस्थिती कितीही वाईट असो. इतरांना मदत करण्यासाठी ते तयार असतात.” अशी प्रतिक्रिया आणखी एका भारतीय युजरने दिली.