मुंबईचा पाऊस म्हटला की, रोमँटिक वातावरणाबरोबरीनेच डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते रस्त्यावर साचलेल्या पाण्याचे. त्यामुळे कित्येकदा जोराचा पाऊस झालाच तर आपण या काळात बाहेर पडणेही टाळतो. पण हे झालं मुंबईकरांसाठी. परंतु कामानिमित्त मुंबईत आलेल्या परदेशी पाहुण्यांना कुठे याची कल्पना असते. अशाच प्रकारच्या प्रसंगाचा सामना अलीकडेच एका ऑस्ट्रेलियन महिलेला देखील करावा लागला होता. तिला पहाटे ३ वाजता परतीच्या प्रवासासाठी फ्लाईट पकडायचे होते. परंतु बाहेर कोसळणाऱ्या धो-धो पावसामुळे ते शक्य होईल असे तिला वाटले नाही. किंबहुना रस्त्यावरील साचलेले पाणी पाहता, आज आपले फ्लाईट चुकतंय अशीच कुणकुण तिला लागून राहिली होती. परंतु घडले वेगळेच तिच्या उबर ड्रॉयव्हरने भर पावसात मुंबईच्या रस्त्यावरून गाडी चालवत थेट त्या महिलेला वेळेत विमानतळावर पोहोचवले. त्यामुळेच तिने इंस्टाग्रामवरून या उबर ड्रॉयव्हरचे आभार मानले आहेत.
Viral Video ‘हे’ केवळ भारतातच घडू शकते; मुंबईच्या धुवाधार पावसातला ऑस्ट्रेलियन महिलेचा अनुभव !
ब्री स्टेली ही एक ऑस्ट्रेलियन पॉडकास्टर आहे. तिच्या उबर ड्रायव्हरने मुंबईचे रस्ते जलमय असतानाही तिला कुशलतेने पहाटे ३ वाजता विमानतळापर्यंत पोहोचवले. याबद्दल तिला आनंद तर झालाच परंतु त्यापेक्षाही तिला आश्चर्यच अधिक वाटले.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-07-2024 at 14:24 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video this can only happen in india australian podcaster praises mumbai uber driver for navigating flooded streets svs