Girl Writes With Both Hands: या पृथ्वीतलावर प्रतिभावान लोकांची कमतरता नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हिडीओमध्ये एक मुलगी दोन्ही हातांनी लिहिताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून सोशल मीडिया युजर्सचाही विश्वास बसत नाही की कोणी इतका प्रतिभावान कसा असू शकतो.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगी दोन्ही हातात खडू घेऊन ब्लॅक बोर्डवर लिहिताना दिसत आहे. ती एकाच वेळी दोन्ही हातांच्या मदतीने प्रचंड वेगाने लिहिताना दिसते. व्हिडीओनुसार, आदि स्वरूपा असे या मुलीचे नाव आहे. ही मुलगी विश्वविक्रम धारक आहे. ती आपल्या दोन्ही हातांनी हिंदी, इंग्रजी, कन्नड अशा अनेक भाषांमध्ये लिहू शकते. तुम्हाला यावर कदाचित विश्वास बसणार नाही, त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

एरिक सोल्हेम नावाच्या ट्विटर यूजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “खूप छान! एकाच वेळी दोन्ही हातांनी लिहू शकणार्‍या भारतातील आदि स्वरूपाला भेटा! ती एक विश्वविक्रम धारक आहे जी कन्नड, इंग्रजी, हिंदी, तुलु, मल्याळम अशा विविध भाषांसह १० अद्वितीय पद्धतीने लिहू शकते.”

आणखी वाचा : हात नसतानाही हा व्यक्ती बनवतोय चाउमीन; VIRAL VIDEO पाहून हैराण व्हाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : अरे बापरे! पर्यटकांसह उंचावरून जमिनीवर धाडकन कोसळलं हॉट एअर बलून, VIRAL VIDEO एकदा पाहाच

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोक त्या मुलीचे कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओवर हजारो कमेंट्स आल्या आहेत. मुलीचं टॅलेंट पाहून बहुतेकांना धक्का बसला आहे. व्हिडीओ पाहून काही लोक म्हणत आहेत की, मुलीने देशाचा गौरव केला आहे.

Story img Loader