Viral Video: समाज माध्यमांवर सतत विविध गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. बसल्या जागी संपूर्ण जगाची माहिती आपल्याला सोशल मीडियामुळे मिळते. बऱ्याचदा पावसाळ्यात अनेक ठिकाणी पूर येतो, पाणी साठते. या संदर्भातील विविध व्हिडीओ आपण पाहतो. नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसात बऱ्याच ठिकाणी पाणी साठले होते; तर काही ठिकाणी पाण्यामुळे लोक वाहूनदेखील गेले होते. पण बऱ्याचदा प्राणीदेखील पावसाच्या पाण्यात अडकतात, ज्यांना बाहेर काढण्यासाठी खूप शर्थीचे प्रयत्न केले जातात. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात एका हत्तीचे पिल्लू नदीच्या पाण्यात अडकलेले दिसत आहे.
सध्या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, पूर येणे अशा नैसर्गिक समस्या उद्भवू लागल्या आहेत. या दिवसात सोशल मीडियावर जंगलातील प्राण्यांचे विविध व्हिडीओ वनाधिकारी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करत असतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ आसामच्या वनाधिकाऱ्यांनी शेअर केलेला आहे.
नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये? (Viral Video)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढली होती, त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. या पाण्यामुळे एका हत्तीचे पिल्लू त्या पाण्यात अडकले आहे. व्हिडीओत हे पिल्लू नदीचे पात्र ओलांडताना दिसत आहे. बराच वेळ चालल्यानंतर काही वनाधिकारी पिल्लाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतात. यावेळी पिल्लाला दोरीच्या सहाय्याने बांधून वर खेचतात. शेवटी प्रयत्नाला यश मिळते आणि ते पिल्लू सुखरुप पाण्यातून बाहेर येते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियवर खूप व्हायरल होत असून युजर्स वनाधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक करताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ X(ट्विटर) वरील @Himanta Biswa Sarma या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून हा शेअर करत व्यक्तीने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “मान्सून आपल्या प्राण्यांसाठीदेखील उग्र असू शकतो, अलीकडेच आमच्या वनाधिकाऱ्यांनी चिरांग येथील आय नदीकाठी वाट चुकलेल्या हत्तीची सुटका केली. त्याच्यावर सध्या मानस राष्ट्रीय उद्यानात उपचार सुरू आहेत कारण आम्ही त्याच्या आईशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत”
हा व्हिडीओला आतापर्यंत चाळीस हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सदेखील करत आहेत.
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एका युजरने लिहिलंय की, “तुम्हाला माझा सलाम, खूप छान हा व्हिडीओ पाहून आनंद झाला”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “तुम्हा सर्वांना आमचा सलाम”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “खूप हृदयस्पर्शी”