Viral Video: अलीकडच्या काळात प्राण्यांबद्दल वाटणारे प्रेम फार कमी पाहायला मिळते, पण ज्या लोकांच्या मनात प्राण्यांबद्दल सहानुभूती असते ते प्राण्यांसाठी काहीही करू शकतात. सोशल मीडियामुळे या गोष्टी सहज आपल्या नजरेस पडतात, ज्यामध्ये कधी काही लोक एखाद्या प्राण्याची काळजी घेताना दिसतात तर कधी प्राण्यांसोबत खेळताना दिसतात. आता असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती गायीला जेवण भरवताना दिसत आहे.
सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात, ज्यात अनेक जण त्यांच्या घरातील पाळीव प्राण्यांचे लाड करताना दिसतात. नुकत्याच काही दिवासांपूर्वी समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये एक व्यक्ती त्याच्या कुत्र्याला अंघोळ घालताना दिसत होता. तर आणखी एका व्हिडीओत एक व्यक्ती एका जिराफाला कुरवाळताना दिसत होता. अशाच प्रकारचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.
हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @mahabharat_status या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एका स्टॉलवर जेवण बनवणारी व्यक्ती जेवण बनवत असताना तिथे दोन गायी येतात. त्यावेळी तो जेवण बनवता बनवता त्यातील एका गायीला स्वतःच्या हाताने पोळी चारतो. त्यानंतर दुसरी गायदेखील पुढे येते, त्यावेळी तो तिलादेखील हाताने पोळी चारतो. त्या व्यक्तीचे गायींबद्दलचे हे प्रेम पाहून सोशल मीडियावर लोक त्याचे प्रचंड कौतुक करताना दिसत आहेत. खरंतर आपल्या हिंदू धर्मात गायींना देवासमान मानले जाते आणि त्यांचे पूजनही केले जाते, त्यामुळे हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.
पाहा व्हिडीओ:
या व्हिडीओवर अनेक जण कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एकाने लिहिलंय की, भाऊ देव सगळं बघतोय, तुला आयुष्यात कधीच काही कमी नाही पडणार; तर आणखी एकाने लिहिलंय की, खूप छान माणूस आहे हा, तर आणखी एकाने लिहिलंय की, श्रीकृष्णांना गायी खूप प्रिय होत्या त्यामुळे ते तुला खूप आशीर्वाद देतील.
या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत जवळपास मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाल्या असून एक मिलियनहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे.