निसर्गाने अनेक सुंदर रहस्ये आपल्या आत दडवून ठेवली आहेत, जी वेगवेगळ्या रहस्यांचा उलगडा करत असते. हे पाहून मन आश्चर्याने भरून जातं. नुकतंच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या मंडारीन बदकाकडे बघा, जे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून जणू काही एखाद्या रबराचं खेळणं आहे की काय असा भास होऊ लागतो. वेगवेगळ्या रंगांच्या वेगवेगळ्या छटा कॅनव्हासवर विखुरल्या गेल्या आहेत. पण हे कोणत्याही रबराचं खेळणं नसून खराखुरा मंदारिन बदक आहे.

हा बदक चीन, जपान, कोरिया आणि रशियातील काही भागांमध्ये आढळून येतो. या व्हिडीओमध्ये मंदारिन बदकाची एक झलक तुमचेही मन जिंकेल. अत्यंत दुर्मिळ असल्यामुळे या सुंदर पक्ष्याबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. असे म्हणतात की, त्यांचे पंख इतके मजबूत असतात की ते उडून झाडापर्यंत पोहोचू शकतात. हे केशरी बदक पूर्व आशियात आढळते. ही बदके झाडाच्या माथ्यावर विसावतात. त्यांचा आकार ४१ ते ४९ सेंमी आणि शेपटासह ६५ ते ७५ सेमी आहे. हे उत्तर अमेरिकेतील वुड डकचे जवळचे नातेवाईक आहे.

Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
drone spray services for farmers drone spraying pesticides for agriculture
कृषी ड्रोन : अर्थार्जनाचा नवीन मार्ग
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Funny video groom busy watching share market trading in wedding ceremony video goes viral
“‘हा’ नाद लय बेकार” नवरदेव स्वत:च्याच लग्नात भर मांडवात मोबाईलमध्ये काय बघतोय पाहा; VIDEO पाहून लावाल डोक्याल हात
accident on Gowari flyover in Sitabardi involved 12 15 vehicle collisions
धक्कादायक! नागपुरातील बर्डी उड्डाण पुलावर १५ वाहने एकमेकांवर धडकली
yavatmal manja throat cut
यवतमाळ : पतंगीचा जीवघेणा खेळ! नायलॉन मांजाने दुचाकीस्वाराचा गळा…

आणखी वाचा : VIRAL : अंत्यसंस्कार करताना पार्थीव मध्यभागी ठेवून कुटुंबीयांनी हसत हसत काढला फोटो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

मंदारिन बदके दिसायला खूप आकर्षक आणि सुंदर असतात. विशेषत: नर बदक त्याच्या सौंदर्यामुळे दुरूनच ओळखता येते. नर बदके मादीपेक्षा जास्त रंगीबेरंगी असतात. हे पक्षी भारतात क्वचितच दिसतात. मंदारिन बदक तिनसुकिया जिल्ह्यातील रंगागोरा भागात डिब्रू नदीच्या काठावर शेवटचे दिसले होते. याचा व्हिडीओ पाहून लोक आकर्षीत होऊ लागले आहेत.

आणखी वाचा : खाबे पासे वाले यात्री जयपूर नू देखांगे…पायलटच्या पंजाबीमधल्या अनाउंसमेंटचा VIRAL VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, “पाजी, तुस्सी ग्रेट हो!”

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Ganesh Chaturthi 2022: ३५६ वर्षे जुन्या या अद्भूत मंदिरात मुर्ती अनेकवेळा समुद्रात फेकल्यानंतरही परतून येत होती…

हा व्हिडीओ gunsnrosesgirl3 नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला १.२ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर २७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘व्वा जवळजवळ अवास्तव दिसते! सुंदर!’ दुसर्‍या युजरने म्हटले, ‘हे खरोखरच अप्रतिम आणि नेत्रदीपक आहे.’ तिसरा यूजर म्हणाला, ‘हा सर्वात सुंदर पक्षी आहे, किती रंगीबेरंगी आहे.’ चौथ्या यूजरने लिहिले, ‘तुम्ही जितके जास्त पाहाल तितके कमीच आहे. हे मंदारिन बदके, तुम्ही त्यांच्यात जितके जास्त मग्न व्हाल.”

Story img Loader