Viral Video: अनेकांना विविध गोष्टींचे छंद असतात. कोणाला डान्स करायला आवडतो, तर कोणाला लिहायला आवडतं, अनेकांना ट्रेकिंग करायलादेखील आवडतं. अशा प्रकारचे विविध छंद जोपासण्यासाठी लोक खूप मोठ्या प्रमाणात मेहनत घेताना दिसतात. या छंद जोपासणाऱ्या व्यक्तींचे विविध व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात; ज्यावर लाखो व्ह्युज आणि लाइक्सदेखील मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; ज्यात एक तरुण एका गुहेत प्रवेश करताना दिसत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @undergroundbirmingham या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक जण एका गुहेत प्रवेश करताना दिसत आहे. सोबतच तो हा व्हिडीओदेखील शूट करीत आहे. यावेळी त्याच्यासोबत टॉर्चदेखील असते. आत जात असताना त्याला काँक्रीट आणि विटांची भिंत दिसते. तो माहिती देतो, “ही एक खूप खूप जुनी कोळशाची खाण आहे.” या गुहेचे तोंड खूप लहान असल्याने सुरुवातीला तो गृहस्थ गुहेत झोपून प्रवेश करताना दिसतो, पुढे गेल्यावर काही वेळानंतर त्याला मोठी गुहा दिसते. या व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलेय, ‘१८६० च्या दशकात एका बोगद्यात जाताना.’ या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे ही गुहा जवळपास १६५ वर्षे जुनी आहे.
या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास ६० हजारांहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून, एक हजारहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर युजर्स अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यात एका युजरने लिहिलेय, “आम्हाला ही गुहा दाखविल्याबद्दल धन्यवाद! पण तुम्ही यातून बाहेर कसे पडलात?”, तर दुसऱ्याने लिहिलेय, “जर तुम्ही एक दिवस अडकलात, तर काय कराल?” आणखी एकाने लिहिलेय, “तुम्ही लोक हे कसं करता मला माहीत नाही; पण मी फक्त हे बघूनच घाबरलोय.”
हेही वाचा: भावा, तू तर ‘वडापाव गर्ल’पेक्षा भारी; गुलाबजाम डोसा बनवणाऱ्या तरुणाचा VIDEO व्हायरल
पाहा व्हिडीओ:
या व्यक्तीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या प्रकारच्या गुहेचा शोध घेणारे अनेक व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत त्याशिवाय याचे ६० हजारांहून अधिक फॉलोअर्सदेखील आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वीही एका व्यक्तीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता; ज्यात एका व्यक्तीला जमिनीत पुरलेल्या जुन्या गोष्टींचा शोध घेण्याची आवड होती. या शोधात त्याला गुप्त धन सापडले होते; ज्यात सोन्याचे काही दागिने होते. हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @insta_trending_vaieral या अकाउंटवरून शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्युज मिळाल्या होत्या. त्याशिवाय १० हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाइक केले होते. काहींना हा व्हिडीओ पाहून आश्चर्याचा धक्का बसला होता.