जंगलातून एका महाकाय सापाला क्रेनने बाहेर काढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कॅरेबियन देशातील डोमिनिकामधून एक विशाल सापाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा साप इतका मोठा आहे की त्याला उचलण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. हा साप रेन फॉरेस्टमध्ये दिसून आला असून हा जगातला सर्वात मोठा साप मानला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक जिवंत साप जो कमीत कमी १० फूट लांब होता. त्याला क्रेनच्या मदतीने उचलण्यात आलं. क्रेनने उचलल्यावर साप वेगाने हालचाल करत होता. हे पाहून आजूबाजूला उभे असलेले लोकं आणि क्रेन चालवणाराही हैराण झाला. ज्या ठिकाणी हा साप आढळून आला तिथे खतरनाक बोआ कंस्ट्रिक्टर सापांची एक प्रजाती आढळते. या प्रजातीचे साप १३ फूट लांब असतात. दरम्यान अजून हे स्पष्ट झालं नाही की, व्हिडीओत दिसणारा साप कोणत्या प्रजातीचा आहे. दरम्यान हा साप जिथे सापडला त्या डोमिनिकाला द नेचर आयलॅंडही म्हटलं जातं. इथे नेहमीच दुर्मीळ प्रकारचे जीव बघायला मिळतात.

रिपोर्टनुसार, या सापाला सर्वातआधी जंगलात काम करणाऱ्या लोकांनी पाहिलं. याला बघूनच ते हैराण झाले. नंतर हा साप ऐवढा मोठा होता की या सापाला उचलण्यासाठी क्रेन बोलवावी लागली. या घटनेचे अनेक फोटो सध्या समोर आले आहेत. ज्यात क्रेनने सापाला उचललेलं दिसत आहे.

क्रेनच्या साह्याने सापाला बाहेर काढण्याच्या व्हिडीओला TikTok वर ७९ दशलक्षाहून अधिक वेळा बघण्यात आले आहे. या भल्या मोठ्या महाकाय आकाराचा असलेल्या सापाच्या व्हिडिओने नेटिझन्सला थक्क केले आहे. अनेकांनी सांगितले की हा जगातील सर्वात मोठा साप आहे.

यावेळी एका वापरकर्त्यांने हा व्हिडीओ पाहून “कदाचित जगातील सर्वात मोठा साप आहे.” असल्याचे संगितले. तर दुसर्‍याने कमेंट करून लिहिले की, “हा साप राक्षसासारखा आहे.”

दरम्यान अशीच एक घटना या महिन्याच्या सुरुवातीला ओव्हरहेड केबलला लटकलेला एक मोठा साप रस्त्यावर खाली पडला, ज्यामुळे फिलीपिन्समधील टॅगबिलारान शहरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video this snake was so huge that it had to be lifted by crane watch scsm