Video viral: जर तुम्ही जंगल सफारीसाठी गेला आहात आणि अचानक तुमच्या गाडीवर वाघाने हल्ला केला तर तुम्ही काय कराल? वाघाच्या भीतीने नक्कीच तुमचा थरकाप उडेल. असाच काहीसा प्रकार जंगल सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांच्या एका ग्रुपसोबत घडला आहे. या पर्यटकांना video viral: पाहायचे होते जेव्हा ते वाघाच्या जवळ गेले, यानंतर जे काही घडले ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे .

वाघाला जवळून पाहण्याचा मोह नडला

सामान्यपणे आपल्यासमोर कुत्रा आला की त्याला हाकलवण्यासाठी आपण हडहड करतो. कुत्राही मागे हटतो, तो आपल्याजवळ येत नाही. पण एखाद्या वाघाला असं आपण हाकलवू शकतो का? जंगलात गेलेल्या पर्यटकांनी तेच केलं. त्यांनी एका खतरनाक वाघाला कुत्र्यासारखं हाकलण्याचा प्रयत्न केला. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जंगल सफारी साठी गेलक्या पर्यटकांची जीप दिसत आहे. जे वाघाला अगदी जवळून पाहण्याच्या इच्छेने बसले होते. त्याने झाडाझुडपांच्या मागे लपलेला वाघ पाहिला होता. यानंतर त्याचे फोटो क्लिक करण्यात ते व्यस्त झाले. पण पुढच्याच क्षणी असं काही घडलं की लोकं पार घाबरून गेली. वाघ अचानक रागाने त्यांच्यावर हल्ला करायला आला. त्यानंतर उघड्या जीपमध्ये बसलेले लोक घाबरून ओरडू लागले. सुदैवाने वाघाने त्यांच्यावर हल्ला केला नाही, अन्यथा काहीही होऊ शकले असते.

Crowds flocked to center area of pune on Friday night to watch the spectacle
पुणे : मध्यभागातील रस्ते गर्दीने फुलले! सलग सुट्यांमुळे सहकुटंब देखावे पाहण्याचा आनंद
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
A case has been registered against the three who assaulted the policeman on patrol Mumbai news
गस्तीवरील पोलिसाला मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल
buffaloes dies due to lightning strike in dam
पाण्यात विजेचा प्रवाह उतरल्याने बंधार्‍यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या चार म्हशींचा दुर्दैवी मृत्यू
pune firemen rescued marathi news
पुणे: अग्निशमन दलाच्या जवानाची तत्परता, कामावर जात असताना दुचाकीला लागलेली आग आटोक्यात
Two young man died by drowning during wash bulls
बैल धुण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा मृत्यू! पोळा सणावर शोकाचे सावट
Ratnagiri,Fishing Boat Sinks in Purnagad Sea, Purnagad sea, fishing boat, Coast Guard, rescue, strong winds, rough sea,
रत्नागिरी : पूर्णगड समुद्रात मासेमारी करणारी नौका खराब वातावरणामुळे बुडाली, दोघा खलाश्यांना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश
tap water Water cut off in some parts of Thane on Wednesday x
ठाण्याच्या काही भागात बुधवारी पाणी नाही; पाणी नियोजनामुळे २४ ऐवजी १२ तासांचे पाणी बंद

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – Video viral: सिंहिणीसोबत सेल्फी काढत होती तरुणी; तेवढ्यात अस्वलाने पकडले कपडे अन्..

IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, जंगल सफारी करताना नेहमी सतर्क राहावे. त्याचवेळी दुसरा वापरकर्ता म्हणतो, सफारी या प्रकारावर बंदी घातली पाहिजे.