Viral Video: सोशल मीडियावर दररोज हजारो, लाखो व्हिडीओ अपलोड होत असतात. यातील काही ठराविक व्हिडीओ व्हायरल होत असतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये जंगली प्राण्यांच्या व्हिडीओचा प्रामुख्याने समावेश असल्याचे पाहायला मिळते. अनेकदा वाघ, बिबटे असे प्राणी शिकारीसाठी पाळीव प्राण्यांवर हल्ला करत असतात. असे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. जंगलांची संख्या कमी झाल्याने जंगली प्राणी मानवी वस्त्यांमध्ये प्रवेश करत असतात. गेल्या काही वर्षांमध्ये हे प्रमाण वाढले आहे.
सध्या जगभरात जंगलतोड सुरु आहे. याशिवाय मनुष्यप्राणी हरिण, सांबर यांसारख्या प्राण्यांची शिकार करत असल्याने या प्राण्यांची लोकसंख्या कमी झाली आहे. परिणामी वाघांसारखे जंगली प्राणी कुत्रा, डुक्कर किंवा गाय अशा प्राण्यांची शिकार करावी लागत आहे. यामुळे त्यांचे मानवी वसाहतींमध्ये येण्याच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. पाळीव प्राण्यांवर शिकारीसाठी अवलंबून राहणाऱ्या एका वाघाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओच्या सुरुवातीला गाईंचा कळप पळत असल्याचे पाहायला मिळते. काही सेकंदानी त्यांच्यामागे लागलेला वाघ धावत असल्याचे दिसते. शिकार मिळवण्यासाठी आलेला वाघ कळपावर हल्ला चढवत असताना एक वासरु कळपातून बाहेर जाऊन दुसऱ्या दिशेला पळत सुटते. एकट्या वासराला हेरुन वाघ नेमका त्याच्यामागे लागतो. १०-१२ सेकंद पाठलाग केल्यानंतर तो वाघ मोठी झेप घेत वासराची मान पकडण्याचा प्रयत्न करतो. वाघ त्या वासरावरची पकड घट्ट करणार इतक्याच एक गाय तेथे धावत येते. गाईला धावत येताना पाहून वाघ वासराला तसच सोडून धूम ठोकतो. ती गाय त्या वासराची आई आहे असा अंदाज लावला जात आहे.
सुशांत नंदा नावाच्या यूजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला १ लाखांपैकी जास्त व्ह्युज मिळाले आहे. सुशांतने व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनवरुन कमेंट बॉक्समध्ये वादविवाद सुरु झाला आहे. या कॅप्शनला विरोध करत अनेक यूजर्संनी सुशांतवर टिका करत असल्याचे पाहायला मिळते.