वाघ म्हटलं की माणसंच नाही तर प्राण्यांनाही धडकी भरते. समोर वाघ दिसताच प्राणीही आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागतात. आपल्यापेक्षा कमी ताकदीचा प्राणी समोर दिसताच वाघ त्याच्यावर हल्ला चढवतो, त्याला आपला सावज बनवतो. वाघाच्या शिकारीतून शक्यतो कुणीच सुटत नाही. वाघ म्हटलं की हे सारं चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतं. नेहमी शिकारीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वाघाला सुद्धा भावना असतात, याची प्रचिती देणारा एक व्हि़डीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हायरल व्हिडीओ लाखो लोकांची मन जिंकून घेताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ एकदा पाहिल्यानंतर तो पुन्हा पुन्हा पाहण्याचा मोह लोकांना आवरता येत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये वाघाच्या बछड्याने त्याच्या आईला एक जादू की झप्पी देताना दिसत आहे. या बछड्याने त्याच्या आईला मोठ्या प्रेमाने जवळ घेत तिला मिठी मारताना पाहून लोकांचं मन भरून येत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वाघिण सुद्धा या सुंदर क्षणांना एन्जॉय करताना दिसून येतेय. वाघिण आणि तिच्या बछड्यामधील हे प्रेमळ आणि अविस्मरणीय क्षणाला पुरस्कार विजेते दिग्दर्शक, निर्माते आणि सिनेमॅटोग्राफर सुब्बय्या नल्लामुथु यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केलंय. याचा हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुधा रमन यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो ट्विटरवर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : हॉटेलमध्ये तंदुरी रोटी खाण्यापूर्वी हा VIRAL VIDEO एकदा पाहा, कॅमेऱ्यात कैद झालं हे किळसवाणं कृत्य

हा सुंदर व्हिडीओ ट्विटर अकाऊंटवर शेअर करत IFS अधिकारी सुधा रमन यांनी एक कॅप्शन देखील लिहिलीय. यात त्यांनी लिहिलंय, “जंगलातील काही सुंदर क्षण तुमच्यासोबत शेअर करत आहे. हे जग प्रेमाने भरलेले आहे. आम्हाला फक्त सामंजस्याची गरज आहे.” यासोबतच हा सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या सुब्बय्या नल्लामुथू यांनाही श्रेय दिले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्सही आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया नोंदवत आहेत. हे निसर्गाचे खरे सौंदर्य असल्याचं युजर्सचं म्हणणं आहे.

आणखी वाचा : VIRAL : नवरीचा डान्स पाहून नवरदेवाची सटकली, भरमांडवात घेतला काडीमोड

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : खादाड नवरीबाई! काही क्षणात बोहल्यावर चढणार, पण चायनीज स्नॅक्स खाण्याचा मोह काही आवरला नाही

पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुब्बय्या नल्लामुथू यांनी ३१ डिसेंबर २०२० रोजी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला होता. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ पाहून वाघांमधील मायाळूपणा पाहून लोक भारावून जात आहेत. आतापर्यंत वाघाच्या शिकारीचे व्हिडीओ पाहून अंगावर थरकाप उडत होता. पण वाघांमधलं हे माय-लेकांचं प्रेम पाहून लोक या व्हिडीओचा भरपूर आनंद घेत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video tiger cub cuddles with its mother netizens say its real beauty of nature prp