Tiger Disturbs Tigress During Her Nap : वाघ हा निशाचर प्राणी असल्याने रात्रीच्या वेळी ते त्यांची शिकार करतात. याचा अर्थ असा की ते दिवसभर झोपतात. बंदिवासात वाढलेले वाघ जंगली वाघांप्रमाणे दिवसाचे १८ ते २० तास झोपतात. वाघ हा एकटा राहणारा प्राणी आहे आणि एकटाच शिकार करतो. वाघिणी बछड्यांना सोबत घेऊन शिकार करत असते. कारण तिला आपल्या बछड्यांना आपल्या शिकारीवर नियंत्रण कसं ठेवायचं हे शिकवायचं असतं. साहजिकच वाघिण शिकार करून आपल्या बछड्यांचे संगोपन करत असेल तर तिला सदैव सतर्क राहावे लागते.

सोशल मीडियावर वाघिणीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधली वाघिण दुपारची झोप घेताना दिसतेय. वाघिण दुपारच्या गाढ झोपेत असताना अचानक वाघ तिची खोड काढू लागतो. तिला जाणूनबुजून त्रास देऊ लागतो. मग काय वाघिण खवळते आणि चिडून तिने वाघाला जी अद्दल घडवली ती पाहून यापुढे हा वाघ कोणाचीही खोड काढताना शंभर वेळा विचार करेल.

a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ

आणखी वाचा : Facts About Indian Railway: भारतीय रेल्वेशी संबंधित ‘या’ गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील!

हा व्हिडीओ एका प्राणीसंग्रहालयातला असल्याचं दिसून येतंय. एक लहान मुलगा या प्राणीसंग्रहालयात फिरताना दिसतोय. काचेच्या पलीकडे वाघ आणि वाघिण बाजुला बसलेले दिसत आहेत. हा लहान मुलगा वाघ आणि वाघिणींना पाहून जवळ जाऊ लागतो. इतक्यात या वाघ-वाघिणींचं भांडण लागतं आणि ते पाहून हा लहान मुलगा तिथून पळून जातो. शांतपणे विश्रांती घेत असलेल्या वाघिणीकडे वाघ जाताना दिसत आहे. वाघाचा तिला स्पर्श होताच ती त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी त्याच्यासमोर उडी मारते आणि वाघावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. वाघाला माहित आहे की, त्याने केलेल्या कृत्यामुळे वाघिणीला आणखी राग येऊ शकतो, म्हणून तो मागे हटतो. मग वाघिण वाघावर जोरजोरात डरकाळी फोडते आणि त्याच्यावर आपल्या पंजांनी हल्ला करण्याचा प्रयत्न करते.

आणखी वाचा : सेम टू सेम लहान बाळासारखा रडतो हा पक्षी, VIRAL VIDEO पाहूनही तुमचा विश्वास बसणार नाही!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : भारतात समुद्रातून बांधलाय ‘वॉटर हायवे’? जाणून घ्या या VIRAL VIDEO मागचं सत्य

वाघिण भडकलेली पाहून वाघ अक्षरशः उंदरासारखा नम्र होतो आणि गप एका तलावाजवळ जाऊन पाणी पिताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहण्यासाठी फारच मजेदार आहे. वाघिण भडकल्यानंतर वाघाची जी अवस्था होते ती पाहून लोकांना हसू आवरत नाहीय. हा व्हिडीओ लोकांना फार आवडू लागलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यास विसरत नाहीत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला १५ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर ५ लाख ८२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स शेअर करू लागले आहेत. हा व्हिडीओ पाहण्यासाठी जितका मजेदार आहे त्याहूनही मजेदार या व्हिडीओवरील कमेंट्स आहेत.

Story img Loader