Viral Video: जंगलातील प्राण्यांचे नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. जंगलातील अनेक गोष्ट कधीही न पाहिलेल्या असतात. त्यात प्राण्यांची शिकार करण्याची पद्धत किंवा प्राण्यांमधील भांडण अशा अनेक गोष्टी आपण पाहतो. सोशल मीडियावर प्राण्यांचे असे व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात; ज्यात एखादा हिंस्र प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करताना दिसतो. तर, कधी कधी काही प्राणी एकमेकांबरोबर खेळताना दिसतात. दरम्यान, आता एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात एक वाघ शिकार करण्यासाठी वेगळीच शक्कल लढविताना दिसत आहे.
जंगलातील प्रत्येक सजीव प्राणी जगण्यासाठी दुसऱ्या सजीव गोष्टीवर अवलंबून असतात. हिंस्र प्राणीदेखील जगण्यासाठी जंगलातील दुसऱ्या प्राण्यांची शिकार करतात. पण, ही शिकार मिळवणं अनेकदा त्यांच्यासाठी खूप कठीण काम असतं. शिकार मिळविण्यासाठी कधी ते शक्तीचा, तर कधी यु्क्तीचाही वापर करतात. आतापर्यंतच्या अनेक व्हिडीओंमध्ये तुम्ही प्राण्यांची शक्ती पाहिली असेल; पण आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये वाघ त्याच्या युक्तीचा वापर करताना दिसत आहे.
नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जंगलामध्ये एका झाडाखाली एक वाघ निवांत झोपला असून, वाघाला झोपलेलं पाहून श्वान त्याच्यासमोरून रस्ता ओलांडायला जातो. श्वान जसा वाघासमोरून थोडा पुढे जातो, तसा झोपेचं नाटक केलेला वाघ जागा होतो आणि श्वानावर हल्ला करतो. वाघाची ही युक्ती पाहून अनेक जण अवाक् झाले आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ X(ट्विटर) वरील @AbhyuSharmaVideos या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत एक दशलक्षाहून अधिक व्ह्युज आणि लाखो लाइक्स आल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय, “वाघाचा डावपेच.” दुसऱ्या युजरने लिहिलंय की, हा श्वान वेडा आहे का? तर तिसऱ्या युजरने लिहिलंय, “हा व्हिडीओ पाहून माझ्या अंगावर काटा आला.” तर, आणखी अनेक जण या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.