Tiger Viral Video: वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी शासनाद्वारे अनेक योजना राबवल्या जात आहेत. दिवसेनदिवस जंगलांची संख्या कमी होत आहे. परिणामी हरीण, सांबर अशा प्राण्यांची संख्या देखील कमी झाल्याचे पाहायला मिळते. भक्ष्य असलेल्या या प्राण्यांच्या कमतरतेमुळे वाघ जंगलातून बाहेर येत आहेत. खाद्याच्या शोधामध्ये ते मानवी वस्त्यांमध्ये प्रवेश करत असल्याच्या घटना वाढत आहेत. जंगलामधून मानवी वस्तीच्या ठिकाणी फिरणाऱ्या वाघांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये एक वाघ शांतपणे रस्त्यावरुन चालत असल्याचे पाहायला मिळते. त्या रस्त्याच्या मागच्या बाजूला दुचाकी, चारचाकी जात-येत आहेत. यावरुन तो रस्ता हायवे असावा असा अंदाज लावता येतो. काही सेकंदांचा हा व्हिडीओ एका दुसऱ्या सीसीटिव्ही फुटेजचा आहे. याला “०८.०५.२३ – काल मध्यरात्री एक वाघ महूमधील आर्मी वॉर कॉलेजच्या गेट क्रमांक ३ जवळ फिरताना दिसला” असे कॅप्शन देण्यात आले आहे. कॅप्शनवरुन ही घटना मध्यप्रदेशमधील महू या ठिकाणी घडली आहे असे म्हटले जात आहे. सोशल मीडियालवर हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. भारतीय वन खात्यातील एका अधिकाऱ्याने “Walking like a boss.” असे लिहून हा व्हिडीओ शेअर केला आहे.
Video: पार्सल आणायला उशीर झाला म्हणून तरुणीने डिलीव्हरी बॉयशी केला वाद; मारायला सुरुवात केल्यावर पुढे..
https://www.loksatta.com/trending/viral-video-girl-argues-and-beat-food-delivery-boy-for-late-food-delivery-watch-full-video-yps-99-3651020/
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशमधील वनाधिकाऱ्यांनी ड्रोन कॅमेऱ्यांसह वाघाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पण त्यांना अद्याप या वाघाची माहिती मिळलेली नाही. आर्मी वॉर कॉलेजच्या आसपासचा परिसर झाडझुडपांनी भरलेला असल्याने शोध घेताना अधिकचा वेळ जात आहे. तेथील वन अधिकारी पवन जोशी यांनी ‘व्हिडीओ फुटेजमध्ये दिसणारा प्राणी वाघ आहे हे लगेच समजते. गेल्या पाच वर्षांमध्ये चोरल, मांडू या ठिकाणी वाघ दिसले आहेत. पण महूमध्ये हा प्राणी दिसण्याची ही पहिली वेळ आहे’ असे म्हटले आहे. मध्यप्रदेशमध्ये वाघांसाठी सहा अभयारण्ये आहेत. वाघांची संख्या वाढल्याने मानवी वस्तीमध्ये फिरण्याचे त्यांचे प्रमाण वाढले आहे.