लोकांना कायमच वन्य जीवनाविषयी कुतुहल असतं. प्राण्यांना पहायला आणि त्यांच्याविषयी जाणून घ्यायला अनेकजण तयार असतात. वन्य जीवनाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी बरेचजण जंगल सफारीसाठीही जातात. प्राण्यांचे बरेच फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती असते. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात. तर काही व्हिडीओ हे मजेदार असतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. हरिण आणि वाघाचा एख व्हिडीओ समोर आला आहे.
हरणावर वाघाचा हल्ला
सामान्यतः वाघ, सिंह आणि बिबट्या हे जंगलात अतिशय धोकादायक शिकारी प्राणी मानले जातात.कितीही मोठा प्राणी असूदेत वाघाला बघून पळून जातो. मात्र वाघ हा अतिश हुशार प्राणी आहे, त्याला आपली शिकार कशी शोधायची हे बरोबर माहित असतं. असाच एका शिकारीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. यामध्ये वाघ हरणाची शिकार करण्यासाठी आधी लपून बसतो, मग अचानक येतो आणि हरणाची शिकार करताना दिसतो.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये वाघ घात करून हल्ला करताना दिसत आहे. नदीकाठचे पाणी पिऊन परतणाऱ्या हरणांच्या कळपावर हल्ला करून शिकार करण्यात वाघ यशस्वी होतो. झुडुपांमध्ये लपलेल्या वाघाने एका हरणावर हल्ला केला आणि त्या आपल्या जबड्यात पकडून ठेवलं.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Mother’s day: भर रस्त्यात आईने मुलाला फटकवलं, कारण एकूण कराल कौतुक
हा व्हिडीओ १.११ मिनिटांचा ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे. जो खरंच अंगावर काटा आणणारा आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक वारंवार हा व्हिडीओ पाहात आहेत. यावर काही युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या.