Viral Video: सध्याचे कडाक्याचे ऊन पाहता कधी एकदाचा पाऊस पडतोय याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. या उन्हामुळे अंगाची अक्षरशः लाही लाही होते. त्यामुळे या उन्हाला केवळ माणसंच नाही तर प्राणी, पक्षीदेखील वैतागले आहेत. अशा वातावरणामध्ये अचानक पाऊस पडल्यावर मन खूप सुखावते. असाच एक मनाला आनंद देणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे; ज्यामध्ये एक उन्हाने त्रासलेला वाघ थंड पाण्यात बसून थंडावा घेत आहे. हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकताच काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात उन्हाला वैतागलेल्या एका तरुणाने चक्क भररस्त्यात गाडीवर बसून अंघोळ केली होती. त्यानंतर आणखी एका व्हिडीओमध्ये एक कुत्रा मालकिणीला चकवा देऊन पावसात भिजण्यासाठी गेला होता. या व्हिडीओनंतर आता वाघाचादेखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात तो उन्हापासून संरक्षण करण्यासाठी पाण्यात बसलेला दिसत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ राजस्थानमधील रणथंबोर नॅशनल पार्कमधील असून यामध्ये तुम्ही पाहू शकता, वाघ एका पाण्यात आरामात बसलेला दिसत आहे. बराच वेळ पाण्यात बसल्यानंतर तो पाणी पिताना दिसत आहे. यासोबत आणखी एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये कडाक्याच्या उन्हात वाघ जंगलातील एका पाणवठ्याजवळ येतो आणि आधी स्वतःची तहान भागवतो. पाणी पिऊन झाल्यावर तो काही वेळ पाण्यात तसाच थांबतो, त्यानंतर तो पाण्यातून बाहेर येतो. या व्हायरल व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, शेवटी हा पण प्राणीच आहे, तर दुसऱ्याने व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीचे कौतुक केले आहे.

हेही वाचा: बापरे! चिमुकली सापाला मारतेय मिठी अन् घेतेय चुंबन; थरारक VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “हिचे आई-वडील वेडे…”

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ranthambhorepark या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यातील पहिल्या व्हिडीओला जवळपास पाच हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून पाचशे लाइक्स मिळाल्या आहेत.

पाहा व्हिडीओ:

तर दुसऱ्या व्हिडीओला बारा हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून सातशेहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. या अकाउंटचे फॉलोवर्स ३९ हजारांहून अधिक असून या अकाउंटवर राजस्थानमधील रणथंबोर नॅशनल पार्कमधील विविध प्राण्यांचे व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.