तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा पुन्हा इंटरनेटवर ट्रेंड होऊ लागल्या आहेत. लुई विट्टोन ब्रँडच्या आपल्या पर्सला लपवल्याने त्यांची चर्चा होत आहे. लोकसभेच्या सत्रादरम्यान ‘super-expensive bag’ लपवतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जेव्हा टीएमसीचे काकोली घोष दस्तीदार महागाईवर बोलत होते, तेव्हा त्यांच्या शेजारी बसलेल्या मोइत्रा त्यांची बॅग शेजारच्या सीटवरून टेबलाखाली पायाजवळ हलवताना कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. अहवालानुसार ही लुई व्हिटॉनची बॅग होती ज्याची किंमत १.५ लाखांपेक्षा जास्त आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी आपल्या वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटीला जागं करत महुआ मोईत्रा यांना टार्गेट करण्यास सुरूवात केलीय. कोणी यावर आपले वेगवेगळे मीम्स, तर कुणी विनोदी पोस्ट शेअर करत या विषयावर आपलं मत व्यक्त करताना दिसत आहेत एकीकडे महागाईचा मुद्दा आक्रमकपणे मांडला जातोय आणि दुसरीकडे खासदारांकडे जवळपास दोन लाखांची बॅग…हा विरोधाभास नेटकऱ्यांना काही पचलेला दिसत नाही.

आणखी वाचा : अपयशाने खचून गेलात? मग सफाई कामगार ते SBI अधिकारी बनलेल्या या महिलेची प्रेरणादायी कहाणी जरूर वाचा!

भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनीही सोमवारी संध्याकाळी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक छोटी व्हिडिओ क्लिप पोस्ट केली होती. व्हिडिओ शेअर करताना भाजप नेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘किंमत वाढीच्या चर्चेदरम्यान मेरी अँटोइनेट महुआ मोइत्रा यांनी तिची महागडी बॅग लपवली – ढोंगीपणाचाही एक चेहरा आहे’.

आणखी वाचा : पांडा पाळणं खायचं काम नाही! या केअरटेकरची काय अवस्था झाली, पाहा हा VIRAL VIDEO

सोशल मीडिया यूजर्स व्हिडीओ शेअर करत विचारत आहेत की, एवढी महागाई असताना महुआ मोइत्रा एवढी महागडी बॅग घेऊन घरी कशा आल्या? लुई व्‍युटन मल्‍लेटियर, ज्‍याला सामान्यत: लुई व्‍युटन या नावाने ओळखले जाते, ही एक फ्रेंच लक्झरी फॅशन हाऊस आणि कंपनी आहे. १८५४ मध्ये लुई व्हिटन यांनी त्याची स्थापना केली होती. या लेबलच्या LV मोनोग्राम लक्झरी पिशव्या आणि चामड्याच्या वस्तूंपासून ते तयार कपडे, शूज, घड्याळे, दागदागिने, उपकरणे, सनग्लासेस आणि पुस्तकांपर्यंत बहुतेक प्रोडक्ट असतात.

आणखी वाचा : Viral Video : धनुषच्या ‘Rowdy Baby’ गाण्यावर ‘या’ अमेरिकन पठ्ठ्यानं केला जबरदस्त डान्स, आयकॉनिक स्टेप्स पाहून थक्क व्हाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

इथे पाहा काही मजेदार ट्विट:

आणखी वाचा : Chinese Rocket Debris : चीनने सोडलेलं ‘ते’ रॉकेट भारतात ‘या’ ठिकाणी कोसळलं, पाहून लोकांना घाम फुटला!, पाहा VIRAL VIDEO

टीएमसी नेते महुआ मोईत्रा पश्चिम बंगालच्या कृष्णनगर मतदारसंघातून खासदार आहेत. 2019 मध्ये भाजपच्या कल्याण चौबे यांचा 63 हजार मतांनी पराभव करून त्या पहिल्यांदा लोकसभेत पोहोचल्या. यापूर्वी त्या आमदार होत्या. २०१६ मध्ये त्यांनी अनेक दशकांपासून डाव्या पक्षांच्या ताब्यात असलेल्या करीमपूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. तृणमूल काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी त्या काँग्रेसमध्ये होत्या, पण काही दिवसांतच त्यांचा काँग्रेसशी भ्रमनिरास झाला आणि नंतर टीएमसीमध्ये प्रवेश केला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video tmcs mahua moitra and her louis vitton bag are trending big on twitter what you need to know prp