सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ अपलोड केले जातात जे बघायला फार मनोरंजक वाटतात, पण खूप काही शिकवतात. एखादी गोष्ट मिळवण्यात अपयश आलं तर खचून जातो. पण पहिल्याच प्रयत्नात मिळालेल्या अपयशाने खचून न जातं पुन्हा जोमाने उभं राहून प्रयत्न केले तर यश तुमच्या पदरात नक्की पडतं, हेच शिकवणाऱ्या एका लहानग्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. इवल्याश्या मुलाने आयुष्याच्या शर्यतीत यश मिळवून लोकांना वेड लावलंय. सोशल मीडियावर सध्या याच चिमुकल्या मुलाची चर्चा सुरूय.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये लहान मुलांची सायकल शर्यत सुरू असल्याची तुम्ही पाहू शकता. मग शर्यतीच्या सुरुवातीला एका ओळीतला मुलाचं सायकलवरचं नियंत्रण सुटतं आणि तो खाली पडतो. बाकीची इतर मुलं मात्र शर्यतीत आपापल्या सायकलवरून वेगाने पुढे निघून जातात. पण शर्यतीच्या सुरूवातीलाच खाली पडलेल्या या मुलाने हार मानली नाही.
अपयशाने खचून न जाता धैर्य दाखवत तो पुन्हा उठतो आणि शर्यत जिंकण्याचा प्रयत्न करतो. पुढे गेलेल्या प्रत्येक मुलाला मागे टाकण्यासाठी या मुलाने आपल्या सायकलचा वेगही वाढवला. एक एक करत या मुलाने सर्वांना आपल्या मागे टातच सगळ्यांच्या पुढे आपला नंबर गाठला. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण शर्यतीच्या शेवटी मात्र याच मुलाने शर्यत जिंकली.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : म्हशीची गुपचूप शिकार करणार होती सिंहीण, पण संपूर्ण डावच उधळला
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : हा व्यक्ती तर ‘इंडियन आयडॉल’ मध्ये असायला हवा होता, एका क्षणात VIDEO VIRAL
कोणत्याही परिस्थितीत हार मानू नये, असा मोठा धडा हा व्हिडीओ लोकांना देत आहे. हा व्हिडीओ आयएएस अधिकारी अविनाश शरण यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. “तुम्ही कुठून सुरुवात केली याने काही फरक पडत नाही, तुम्ही कुठे संपलात हे महत्त्वाचे आहे.” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागलाय.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यासाठी विसरत नाहीत. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला 2 लाख 60 हजारांच्या जवळपास व्ह्यूज मिळाले आहेत. १५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.