तुम्ही अनेकदा अनेक तरुणांना रस्त्यावर हुल्लडबाजी करताना पाहिलं असेल. अनेक मुलं रस्त्यावर गाडी पार्क करून त्यावर चढतात आणि गाणी वाजवून धिंगाणा घालताना दिसतात. असे तरुण अनेदा पोलिसांच्या तावडीतून सुटतात. पण प्रत्येक वेळी त्यांचं नशीब साथ देईलच असं नाही. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात गोंधळ घालणाऱ्या तरुणांना पोलिसांनी पकडलं आहे. रात्री रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्या या तरूणांना पोलिसांनी असा धडा शिकवलाय तो पाहून तुम्ही म्हणाल, यांना अशीच शिक्षा मिळायला हवी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अनेक तरुण गाडीच्या छतावर चढून रस्त्यावर गोंधळ घालताना दिसत आहेत. या तरुणांचे मित्रच व्हिडीओ बनवत होते. नेहमीप्रमाणे या वेळीही पोलिसांपासून सुटका होईल, असं या मुलांना वाटलं होतं. मात्र प्रकरण उलटलं आणि पोलिसांनी सर्वांनाच पकडले. या व्हिडीओचा शेवट मात्र फारच मजेदार आहे. जे तरूण रात्री गाडीवर चढून गोंधळ घालत होते तेच तरूण मात्र व्हिडीओच्या शेवटी पोलीस ठाण्यात चक्क कान पकडून माफी मागताना दिसत आहेत. त्यांना मिळालेली ही शिक्षा फारच मजेदार आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ही दोस्ती तुटायची नाय…; पाहा माकड आणि पक्ष्यांची अनोखी मैत्री

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : याला म्हणातात Instant Karma ! मंदिराच्या खिडकीतच अडकला चोर, पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ bhutni_ke_memes नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आलाय. रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्या या तरुणांचा व्हिडीओ बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करण्याचा मोह मात्र लोकाना आवरता येत नाहीय.