दारू पिणं आनंदासाठी असो की दु:ख विसरण्यासाठी, एका दारूड्याला दारू पिण्यासाठी एक छोटंसं कारण सुद्धा पुरेसं ठरतं, असं बोललं जातं. घरातला एक माणूस दारूचा गुलाम झाला की त्याच्या आसपासच्या किमान वीस जणांचे तरी जीवन नासते. त्रासाला, हिंसेला आणि निर्दयतेला बळी पडते. त्याच्या शरीराचे नुकसान होते ते वेगळेच. डोक्यापासून पायापर्यंत आपल्या शरीराचा असा कोणताही अवयव नाही जिथे दारूचा विपरीत परिणाम होत नाही. हे सगळं माहित असुनही काहीजण दारूच्या आहारी जातात. अशाच एक दारूड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय.
एक दारूडा काय काय करेल आणि बोलेल याची कोणालाच कल्पना नसते. काही लोक थोडेसे प्यायल्यानंतर लोळू लागतात तर काहीजण उशिराने दारूच्या आहारी जातात. जो खूप मद्यधुंद असतो तो कोणाशीही कसंही उलट सुलट बोलू लागतो. असे अनेक व्हिडीओ तुम्ही आतापर्यंत पाहिले असतील. पण एका दारुड्याला तो शुद्धीत असाताना सुद्धा त्याला त्याच्या दारू पिण्याबाबत प्रश्न केल्यानंतर जे उत्तर मिळालं, ते ऐकून तुम्ही अक्षरशः पोट धरून हसाल हे मात्र नक्की. हा मजेदार व्हिडीओ काही वेळात एक लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि हजारो लोकांनी तो लाइक सुद्धा केला आहे. या व्हिडीओवर नेटिझन्सही जोरदार कमेंट करत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती बाकावर बसलेली दिसत आहे. ‘तू इतका दारू का पितो?’ असं या दारूड्याला विचारलं असता, त्याने लगेचच माघार घेतली. मी दारू पीत नाही, असं तो धडधडीत बोलताना दिसून येतोय. यापुढे बोलताना ती व्यक्ती म्हणते, “मी दारू कुठे पितो? मी पीतच नाही. पण जर कोणी आग्रह केला तर मी छोटे पॅक पितो.” या व्हिडीओमध्ये जे काही दिसतंय ते पाहून तुम्ही पोट धरून हसाल. एक दारुडा मोठ्या आत्मविश्वासाने कसं खोटं बोलतोय, हे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. किंबहुना, जेव्हा त्या व्यक्तीच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला प्रश्न विचारला गेला, तेव्हा त्याने चपखलपणे उत्तर दिले, “तोच मला दारू पिण्यासाठी आग्रह करतो.” त्यानंतर मात्र लोक अगदी खळखळून हसू लागले आहेत.
आणखी वाचा : स्वतःचा व्हिडीओ बघताच माकडांची मजेशीर रिअॅक्शन; VIRAL VIDEO पाहून खळखळून हसाल
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : ‘मेरा पिया घर आया’ म्हणत लग्नात नवरीने मैत्रिणीसोबत केली जबरदस्त एन्ट्री, धमाकेदार डान्स पाहून सारेच जण चकित
या दारूड्याचा हा मजेदार व्हिडीओ giedde नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. त्यानंतर हा व्हिडीओ अक्षरशः वाऱ्यासारखा सोशल मीडियावर पसरू लागला आहे. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ५७ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर साडे सहा हजारांपेक्षा जास्त लोकांनी या मजेदार व्हिडीओला लाईक केलंय.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : बस चालवताना ड्रायव्हर अचानक बेशुद्ध पडला, पुणेकर गृहिणीने ‘जे’ केलं ते पाहून कराल कडक सॅल्युट!
हा व्हिडीओ एकदा पाहिल्यानंतर तो वारंवार पाहण्याचा मोह मात्र लोकांना आवरता येत नाहीय. लोक या व्हिडीओखाली एकापेक्षा एक मजेदार कमेंट्स करत आपआपली मत व्यक्त करताना दिसून येत आहेत. या व्हिडीओखालील कमेंट्स देखील वाचण्यासारख्या आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर व्यक्ती कोणत्याही मूडमध्ये असला तरी त्याच्या चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल आल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की.