सोशल मीडियाचं जग वेगवेगळ्या विचित्र व्हिडिओंनी भरलेलं असतं. दररोज इथे मोठ्या संख्येने असे व्हिडीओ अपलोड होत असतात. काही व्हिडीओ पाहून आपल्या डोळ्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. तर काही व्हिडीओ हे आश्चर्याचा धक्का देणारे असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. हा व्हिडीओ एका दिव्यांग व्यक्तीचा आहे. हा दिव्यांग व्यक्ती व्हीलचेअरवरून खाली पडला, पण त्यानंतर फ्रेममध्ये जे दिसलं ते पाहून सारेच जण थक्क झाले आहेत. हा दिव्यांग व्यक्ती खाली पडल्यानंतर दोन्ही पायांवर चालायला लागला. हा व्हिडिओ एका दिवसात सुमारे १ मिलियन लोकांनी पाहिलाय आणि हजारो लोकांनी त्याला लाइक केलं आहे. असं नेमकं काय घडलं की हा दिव्यांग व्यक्ती पडल्यानंतर चालायला लागला, यामागे काय सत्य आहे याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा