सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हे गमतीदार असतात, काही व्हिडीओ हे आश्चर्याचा धक्का देणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. प्रवाशांनी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करू नका किंवा चढण्याचा प्रयत्न करू नका, असं वारंवार आवाहन केलं जात असलं तरी काही महानग असे असतात जे यातून कोणताही धडा घेत नाहीत आणि आपला जीव धोक्यात घालतात. कधी कधी ते मोठ्या अपघाताला बळी पडतात आणि मृत्यूही पत्करतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. पण त्यानंतर जे घडतं ते फार धक्कादायक आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक ट्रेन प्लॅटफॉर्मवर येत असते. तितक्यात ट्रेनच्या एका डब्ब्याच्या दरवाजाला पकडून सरपटत असल्याचं दिसून येतं. ज्या वेगाने ही ट्रेन पुढे जातेय त्याच वेगाने हा व्यक्ती आपले पाय सरपटत ट्रेनखाली आपले पाय जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतो. ही ट्रेन पुढे जाऊन प्लॅटफॉर्मवर थांबेपर्यंत ही व्यक्ती ट्रेनच्या दरवाजाला अडकलेली असते.
चालत्या ट्रेनखाली आल्यानंतर ही व्यक्ती जिवंती राहणार नाही, असं व्हिडीओ पाहताना मनात विचार येऊ लागतात. पण तितक्यात एखादा चमत्कारच घडावा असं दृश्य पाहून अनेकांना धक्का बसतो. प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या एका आरपीएफ जवानाची नजर त्याच्यावर पडली आणि त्याने त्या व्यक्तीला वाचवले. ही घटना पटियाला रेल्वे स्टेशनची आहे.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : कासवाला कधी डान्स करताना पाहिलंय का? हा दुर्मिळ क्षण एकदा बघाच
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : जमिनीपासून कित्येक फूट उंचीवर स्कायडायव्हर्सचा अफलातून डान्स, VIRAL VIDEO पाहाच
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे
पापाराझी व्हायरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ अपलोड केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “काही लोक भाग्यवान असू शकतात कारण आमचे जवान त्यांना वाचवण्यासाठी आहेत. आरपीएफ हेड कॉन्स्टेबल रघुबीर सिंग एका माणसाला ट्रेनमधून ओढताना दिसल्याने न घाबरता धावले. त्याने त्या व्यक्तीला मृत्यूच्या तोंडातून वाचवले.” हा व्हिडीओ ५ लाख २७ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.