गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ‘कच्चा बादाम’ गाण्याचा ट्रेंड काही संपण्याचं नाव घेत नाहीय. हे गाणे ऐकून आता तुम्हाला कंटाळा आला असेल. ‘कच्चा बादाम’ची क्रेझ पाहून नंतर ‘कच्चा आमरूद’ हे गाणं देखील व्हायरल झालं. याच ट्रेंडमध्ये आता आणखी एक नव्या गाण्यावे धडक मारलीय. ‘कच्चा बादाम’ गाण्याला आता ‘काला अंगूर’ हे नवं गाणं जोरदार टक्कर देत आहे. या नव्या गाण्यावर लहान्यांपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत सारेच जण वेगवेगळे व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
‘कच्चा बादाम’ गाण्यानंतर भुबन बदयाकर या शेंगदाणा विक्रेत्याचे नशीब रातोरात बदलले. ‘कच्चा बादाम’ पाठोपाठ आता एका द्राक्ष विक्रेत्याचं नवं गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. द्राक्ष विक्रेत्याचा हा व्हिडीओसमोर आल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स त्याला प्रचंड पसंती देत आहेत. हा द्राक्ष विक्रेता ‘काला अंगूर’ असं एक गाणं गाताना दिसतेय. ज्या पद्धतीने त्याने हे गाणे गायले त्यावरून हे गाणं देखील सुपर हिट होणार असल्याचे बोलले जात आहे. या गाण्यावर आज लाखो युजर्स व्हिडीओ बनवत विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करत आहेत.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : लज्जास्पद! भररस्त्यात एका दिव्यांगाला पती-पत्नीकडून काठीने मारहाण
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काळी द्राक्षे असलेल्या गाडीवर एक माणूस कसा बसला आहे. काळी द्राक्षे विकत असताना तो ‘काला अंगूर’ गाणं गात आहे. द्राक्ष विक्रेत्याच्या स्टाईलने तेथे बघ्यांची गर्दी झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा : रस्त्यावर भीक मागून आईने मुलासाठी घेतली स्कुटी, चिल्लर भरलेले कॅन घेऊन शोरूम गाठलं, पाहा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : बाप हा बापच असतो! लेकाच्या आनंदासाठी वडिलांनी बनवला लाकडी रणगाडा, पाहा VIRAL VIDEO
द्राक्ष विक्रेता झाला आता सोशल मीडिया स्टार
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. मात्र यातून अनेकांना रातोरात प्रसिद्ध होण्याची संधी मिळतेय. आता लोकांच्या डोक्यातून ‘कच्चा बदाम’ गाण्याचा फिवर उतरत नाही तोवर द्राक्ष विक्रेत्याच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडिया गाजवतोय. आता ‘कच्चा बादाम’प्रमाणे या गाण्याला देखील लोकांची पसंती मिळतेय. एक द्राक्ष विक्रेता काळे द्राक्ष विकत असल्यचं या व्हिडीओत दिसत आहे. या दरम्यान तो पेरू विक्रेता मजेशीरपणे त्यांच्या अंदाजात ‘काला अंगूर’ हे गाणे गातोय.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ saaliminayat नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. बघता बघता हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की या व्हिडीओला आतापर्यंत २.५ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाख १० हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर त्यांचं मत व्यक्त करायला विसरत नाहीत.