पालकत्व अवघड असते, विशेषत: जेव्हा तुमचे मूल लहान वयाचे असते. या वयात, लहान मुलांना इकडे तिकडे पळायला आवडते आणि त्यांना जे काही मिळेल ते त्यांच्या तोंडात घालतात. अलीकडेच, ओहियोमधील एका महिलेला तिच्या दोन वर्षांच्या मुलाला व्यावसायिक सॉकर खेळ पाहण्यासाठी घेण्यासाठी गेले असता एका भीतीदायक गोष्टीचा सामना करावा लागला. त्या महिलेच काही सेकंद दुसरीकडे लक्ष गेल्यावर खेळ चालू असतानाच लहान मुलगा सॉकर मैदानावर गेल. हे दिसताच ती महिला पळाली आणि त्याला सुरक्षितपणे हाताशी धरून स्टँडवर परत घेऊन आली.
नक्की काय झालं?
फोटो जर्नलिस्ट सॅम ग्रीनने या घटनेचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. ‘सिनसिनाटी एन्क्वायरर’ साठी काम करणारे श्री ग्रीन यांनी ट्विटरवर लिहले की, “एका तरुण पिच आक्रमणकर्त्याला त्यांच्या स्वत:च्या वैयक्तिक सुरक्षिततेच्या तपशीलामुळे पटकन पकडले गेले.” हा फोटो काही वेळातच व्हायरल झाला.टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना ७ ऑगस्ट रोजी एफसी सिनसिनाटी विरुद्ध ऑर्लॅंडो सिटी एससी सामन्यादरम्यान घडली होती. मॉस्को, ओहायो येथील टकर असं त्या मुलाच्या आईच नाव आहे.
नेटीझन्सच्या प्रतिकिया
मेजर लीग सॉकरच्या अधिकृत ट्विटर पेजने या घटनेची एक क्लिप देखील ट्विट केली आहे.क्लिपसह, ट्विटमध्ये म्हटले आहे की “आम्हाला आशा आहे की ही आई आणि तिचा तरुण पिच आक्रमणकर्ता चांगला दिवस घालवतील.” ९ ऑगस्ट रोजी प्रकाशित झालेल्या या व्हिडिओला आत्तापर्यंत जवळजवळ ३ हजाराच्या घरात व्ह्यूज आहेत. तर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. या घटनेच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, अनेक वापरकर्त्यांनी टकर यांच्या जलद कृतीबद्दल कौतुक केले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर, एका वापरकर्त्याने कमेंट केली की, “लहान मुलांना पृथ्वीवरील सर्वात वेगवान मानव म्हणून घोषित करायला हवं.” तर दुसरा वापरकर्ता लिहतो की, “लहान मुले! पृथ्वीवरील सर्वात वेगवान मानव.”
A young pitch invader was quickly scooped up by their own personal security detail without incident. #FCCincy #mls pic.twitter.com/gK2bzgNdas
— Sam Greene (@SGdoesit) August 8, 2021
गुड मॉर्निंग अमेरिकेशी या घटनेबद्दल बोलताना मॉर्गन टकर म्हणाल्या, “मी अक्षरशः एका सेकंदासाठी दूसरीकडे पाहिले तेव्हा तो धावत जात होता. तो सॉकर बॉल त्याच्या डोक्यात आदळला असता म्हणून त्यावेळी मी खूप घाबरले होते.” टकर पुढे सांगतात की, “मी माझ्या मुलाला तू असं का केलस असं विचारलं तर त्याने शांतपणे “आई, सॉकर बॉल” एवढचं उत्तर दिलं.
We hope this mother and her young pitch invader are having a great day.
pic.twitter.com/hKfwa6wyWI— Major League Soccer (@MLS) August 9, 2021
त्या लहान मुलाला खेळाडूंनी मैदानाच्या दुसऱ्या बाजूला जाणे आवडलं नाही. त्याला खेळाडूंनी त्याच्या बाजूलाच रहावं अशी त्याची इच्छा होती.