Police Stopped Traffic For Tiger : सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात काही हसवतात, तर काही आश्चर्यचकित करतात. याशिवाय हृदयाला स्पर्श करणारे काही व्हिडिओ आहेत. लोकांना शिकवण्याचं काम हे व्हिडीओ करत असतात. आयुष्य कसं जगलं पाहिजे, हे व्हिडीओ पाहिल्यानंतर कळतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो तुम्हाला नक्कीच आवडेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाघ, सिंह, बिबट्या असे कधीही न दिसणारे प्राणी जंगल सफारी, नॅशनल पार्क किंवा प्राणीसंग्रहालयात गेल्यावर जेव्हा दिसतात तेव्हा कुणालाही आनंद होतोच. पण त्यासोबत घामही फुटतो. समोर दिसला तरी या प्राण्यांच्या जवळ जाण्याची हिंमत कुणीच करणार नाही. कधी-कधी वाहतूक पोलीस लोकांना रस्ता ओलांडायला मदत करतात, तुम्ही अनेकदा असे व्हिडीओही पाहिले असतील. पण तुम्ही कधी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला वाघाला रस्ता ओलांडून देताना पाहिलं आहे का? कदाचित पाहिलं नसेल, कारण अशा घटना क्वचितच पाहायला मिळतात, पण व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असंच काहीसं पाहायला मिळतंय. एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने चक्क वाघासाठी रस्त्यावरची सगळी वाहतूक थांबवली. तसंच वाघ सुद्धा अगदी रूबाबात आणि ऐटीत रस्ता ओलांडताना दिसून आलाय.

आणखी वाचा : बाबा रे! मॉलमध्ये मुलीने मुलाला लाथा-बुक्क्या आणि चपलीने धू-धू धुतलं, या मारहाणीचा VIDEO VIRAL

व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, कसे वाहतूक पोलीस कर्मचारी हाताच्या इशाऱ्याने वाहने थांबवतो आणि वाघाल रस्ता ओलांडून देतो. या दरम्यान, वाघ देखील त्याच्या जंगलाबाहेर पडत अतिशय आरामात रस्ता ओलांडतो. हा एक अतिशय अनोखा व्हिडीओ आहे. हा वाघ बराच वेळ रस्त्याच्या कडेला थांबून होता. रस्त्यावरील सुरू असलेली वाहतूक पाहून त्याला रस्ता ओलांडता येत नव्हता. ही माहिती वन विभागाला मिळाली आणि वन पथक धावत महामार्गावर आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोन्हीकडील वाहतूक थांबवून वाघाला जाण्याचा मार्ग मोकळा केला. वाहतूक थांबली असल्याचं पाहून वाघ सुद्धा हलक्या हलक्या पावलांनी रस्ता ओलांडू लागला. आपल्या सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी वाघाने बराच वेळ घेतला. तितका वेळ महामार्गावरची वाहतूक ठप्प होती. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी ही घटना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. त्यानंतर याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला.

आणखी वाचा : उंदीर आणि कबुतराची लढाई तुम्ही कधी पाहिलीय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : चालत्या मेट्रोत मुलगी अचानक डान्स करू लागली, प्रवासी बघतच राहिले

या व्हिडीओमध्ये एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे वाघ खूपच शांत दिसत आहे. तो सहज रस्ता ओलांडतो. लोक त्याच्या जंगलात परत जाण्यासाठी धीराने वाट पाहत आहेत. हा व्हिडिओ IFS अधिकारी परवीन कासवान यांनी शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी पोलिस अधिकारी आणि जनतेचे कौतुक केले. त्यांनी लिहिले, “ग्रीन सिग्नल फक्त वाघासाठी. हे चांगले लोक आहेत. अज्ञात ठिकाण.” मात्र, काही युजर्सनी व्हिडीओच्या कमेंटमध्ये हा व्हिडीओ महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याचे सांगितले आहे.

हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर बघता बघता तो इतका व्हायरल झाला की आतापर्यंत या व्हिडीओला १, ७५,००० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. तर अनेकांनी पोलिसाचे कौतुक केले आहे.