ज्यांनी ट्रेनने प्रवास केला आहे त्यांना हे माहित असेलच की भारतीय रेल्वे अनेकदा देशातील सर्वात सुंदर लँडस्केप पार करत असते. तुम्हाला जर चित्तथरारक दृश्यांसाठी ट्रेन राईड करायला आवडत असेल तर हा व्हायरल व्हिडीओ तुम्ही चुकवू नका. भारतीय रेल्वेने राजस्थानमधील दारा घाटाच्या वाळवंटातून जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनचे विहंगम दृश्य दाखवणारा एक आकर्षक व्हिडीओ शेअर केला आहे. नयनरम्य दृश्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सुंदर नजराणा पाहून व्यक्ती कोणत्याही मूडमध्ये असला तरी त्याचा मूड एकदम फ्रेश होतो.
भारतीय रेल्वे मंत्रालयाने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. राजस्थानमधल्या दारा घाटाच्या हिरवाईमधून वळसा घेत ओलांडणाऱ्या या ट्रेनचा व्हिडीओ खूपच अप्रतिम आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुमच्याही तोंडी, “काय ती झाडी …काय ते जंगल ….काय तो घाट…” असे उद्गार आल्याशिवाय राहणार नाही. या घाटाने पावसात जणू हिरवा शालू पाघरून बसल्या सारखा आपल्या दृष्टीस पडतो. जर उंचावरून हे दृश्य इतके मनमोहक दिसत आहे तर मग आत ट्रेनमध्ये बसून हा नजराणा किती सुखद अनुभव देत असेल, याची कल्पना जरी केली मन प्रफुल्लीत होऊन जातं. हा व्हिडीओ निसर्गप्रेमींना मोठ्या प्रमाणात आकर्षून घेत आहे. या व्हिडीओमध्ये बॅकग्राऊंडला पक्ष्यांच्या किलबिलाटासह दारा घाटाचे हिरवेगार दृश्य कैद केले आहे.
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ:
भारतीय रेल्वेने हा व्हिडीओ शेअर करताना एक कॅप्शन देखील लिहिलीय. “निसर्गाच्या विपुलतेने बहाल! @wc_railway च्या कोटा-नागदा विभागातील दारा घाटांच्या हिरवाईने जात असलेल्या एक्सप्रेस ट्रेनचे विहंगम दृश्य,” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केलाय. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करण्याचा मोह मात्र लोकांना आवरता येत नाहीय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडला आहे की आतापर्यंत या व्हिडीओला १२ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत. एका युजरने लिहिले की, “असा प्रवास आयुष्यात एकदा तरी करावा’! दुसऱ्या युजरने या दृश्यावर अप्रतिम असं म्हटलंय तर तिसऱ्या युजरने “फॅन्टॅस्टिक” असं म्हटलंय.