तुम्ही मारहाणीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. त्यातले बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. यातही जर मुलींची मारहाण असेल तर तो व्हिडीओ पाहण्यासाठी आणखीनच लोक उत्सुक असतात. मुलींच्या हाणामारीचे व्हिडीओ शेअऱ होताच व्हायरल सुद्धा होतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात शाळकरी मुली एकमेकांना भिडलेत. विशेष म्हणजे या मुली शाळेच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत आणि या तिघी मुली शाळेच्या वर्गातच दिसत आहेत. या मारहाणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ही मारहाण पाहण्यासाठी लोक हा व्हिडीओ वारंवार पाहताना दिसून येत आहेत.
एका शाळेच्या वर्गातच तीन मुलींमध्ये मारहाणीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमधला आहे. या व्हिडीओमध्ये तिन्ही मुली समोरासमोर असल्याचं दिसत आहे. तिघी जणी एकमेकींचे केस ओढत जमिनीवर आपटण्याचा प्रयत्न करत आहे. एका मुलीने तर दुसऱ्या मुलीचं डोकंच बेंचवर आपटल्याचं दिसतंय. या तिघी जणी एकमेकींसोबत फाईट करताना दिसत आहेत. मात्र यातली कोणती मुलगी कोणाविरोधात फाईट करतेय, हे मात्र लोकांना समजत नाहीय. तसंच हे इतकं मोठं भांडण नक्की कोणत्या कारणावरून झालंय, हे सुद्धा अद्याप समोर आलेलं नाहीय. मात्र, हा व्हिडीओ तेजीने व्हायरल होऊ लागलाय. एवढी तुफान भांडणं चाललेली दिसल्यावर काहींनी त्यांना थांबण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. या मुली भांडणं करतच राहिल्या.
हा व्हिडीओ amit3_singh नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. मात्र, या व्हिडीओबाबत अद्याप अधिकृतरित्या खात्री झालेली नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या विद्यार्थिनींनी एका खासगी शाळेचा ड्रेस परिधान केला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शाळेची बदनामी होत आहे. शाळेचे संचालक आलोक मिश्रा यांचे म्हणणे आहे की, हा व्हिडीओ आमच्या शाळेचा नाही. हा व्हिडीओ अन्य कोणत्या तरी शाळेतील असेल, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर व्हिडीओची खात्री झाल्यानंतरच शाळेचे नाव समोर येईल.
आणखी वाचा : ‘पुन्हा खोड काढलीस तर याद राख’; चिडलेल्या बैलाने चांगलंच तुडवलं, पाहा हा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : गाढ झोपलेल्या महिलेच्या अंगावर चढला कोब्रा, VIRAL VIDEO पाहून अंगावर काटा येईल
हा व्हिडीओ जे जे पाहत आहेत तो प्रत्येकजण हैराण होत आहेत. या व्हिडीओमध्ये विद्यार्थिनी ज्या प्रकारे एकमेकांना मारहाण करत आहेत, त्यावरून एकाही मुलीला गंभीर दुखापत झाल्याचे दिसत नाही. या विद्यार्थ्यांमध्ये शाळा प्रशासनाची भीती नाही का, असा सवालही काहींनी सोशल मीडियावर उपस्थित केला. शाळेतील अशा घटना अतिशय लाजिरवाण्या आहेत असे काही लोक लिहित आहेत. अशा वेळी शाळा प्रशासनाने कठोर पावले उचलली पाहिजेत. या व्हिडीओची पुष्टी झाल्यास शाळेचे नावही लोकांसमोर येईल. सध्या या व्हिडीओची चौकशी सुरू आहे.