Ricky Pond Dance Viral Video: भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिवस काल पार पडला असून, त्यानिमित्त अनेकांनी खास पोस्ट शेअर केल्या. त्यामध्ये काहींनी स्वातंत्र्य दिनानिमित्त काही चांगले संदेश दिले, तर काहींनी देशभक्तीवर आधारित गाण्यांवर डान्स केला. सध्या सोशल मीडियावर असाच एक डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात एक परदेशातील प्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर ‘कहते है हमको इंडिया वाले’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे.

समाजमाध्यमांवर व्हायरल होणाऱ्या भारतीय गाण्यांवर नेहमीच परदेशांतील लोकही थिरकत असतात. सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असणारे इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर रिकी पाँडही भारतातील अनेक गाण्यांवर सातत्याने नवनवीन रील्स बनवीत असतात. अनेक भारतीय त्यांना फॉलोदेखील करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी गुलाबी साडी, तौबा तौबा, सुसेकी अशा विविध भारतीय गाण्यांवर डान्स केला होता. दरम्यान, आता भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांनी ‘कहते है हमको इंडियावाले’ या गाण्यावर डान्स केला आहे.

lakhat ek amcha dada fame isha sanjay and juee tanpure dance on uyi amma
Video : सूर्या दादाच्या बहि‍णींचा जबरदस्त डान्स! सुपरहिट ‘उई अम्मा’ गाण्यावर थिरकल्या, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
dada kondke
Video : “हाडाचा कलाकार आहे भाऊ! रडला पण डान्स नाही विसरला”; दादा कोंडके स्टाईल चिमुकल्याचा डान्स पाहून पोट धरून हसाल
Video of a little child presents amazing lavani dance in a school program
Video : काय भारी नाचतोय राव! जि.प. शाळेत चिमुकल्याने सादर केली अप्रतिम लावणी; नेटकरी म्हणाले, “याच्यासमोर सर्व लावणी सम्राज्ञी फिक्या..”
Director Laxman Utekar clarification after meeting Raj Thackeray regarding the film Chhawa Mumbai news
‘छावा’मधील लेझीम नृत्याच्या प्रसंगाला कात्री; राज ठाकरे यांच्या भेटीनंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचे स्पष्टीकरण
Mumbai local video of some girls dancing on a marathi song
‘तुमच्या पुढ्यात कुटते मी ज्वानीचा मसाला’ गाण्यावर मुंबई लोकलमध्ये तरुणींचा भन्नाट डान्स; लाखो लोकांनी पाहिलेला VIDEO तुम्ही पाहिला का?
gilr dance
“ऐका दाजीबा….!”, मराठमोळ्या गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स, Viral Video पाहून तुम्हीही व्हाल तिचे चाहते
Mother daughter amazing duo did an amazing dance on the Koli song Video viral
“तो चक चक सोन्याचा…”; माय-लेकीची भन्नाट जोडी, कोळी गीतावर केले अफलातून नृत्य! Video पाहून सांगा, कोणी मारली बाजी?

या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, समाजमाध्यमांवर प्रसिद्ध असलेला ‘डान्सिंग डॅड’ ऊर्फ ​​रिकी पाँड यांनी हॅप्पी न्यू इयर या बॉलीवूड चित्रपटातील ‘कहते है हमको इंडिया वाले’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहे. यावेळी या व्हिडीओमध्ये त्यांच्यासह एक तरुणही थिरकताना दिसत आहे. यावेळी ते गाण्यातील प्रत्येक स्टेप अगदी हुबेहूब करीत आहेत. त्याशिवाय त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावदेखील खूप सुंदर आहेत.

हेही वाचा: “पोलिस हवे तर मुंबई पोलिसांसारखे…” स्वातंत्र्यदिनानिमित्त खाकी स्टुडिओ म्युझिक बँडने केले देशभक्तिपर गाण्यांचे सादरीकरण; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ricky.pond या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या गाण्याला आतापर्यंत दोन मिलियनहून व्ह्युज आणि दोन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर युजर्स अनेक कमेंट्स करतानाही दिसत आहेत. त्यावर एकाने लिहिलेय, “सुंदर डान्स.” दुसऱ्या एकाने कमेंटमध्ये लिहिलेय, “भारताकडून तुम्हाला खूप प्रेम.” आणखी एकाने लिहिलेय, “एकदम जबरदस्त डान्स केला.” तर आणखी एकाने लिहिलेय, “स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, लवकर भारतात या.”

दरम्यान, समाजमाध्यमांवर सेलिब्रिटी किली पॉलनेही भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच इतर अनेक परदेशी कलाकारांनीही भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader