Desi Woman Viral Video: १५ ऑगस्ट (काल) रोजी संपूर्ण देशभरात ७८ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. या दिवशी जागोजागी तिरंगा ध्वज फडकवून स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा केला गेला. सध्या सोशल मीडियावर या दिवसाचे अनेक व्हिडीओ आणि खूप फोटो व्हायरल होत आहेत. त्यात अनेक दिग्गजांपासून ते सामान्यांपर्यंत विविध पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करताना दिसत आहेत. काही जण देशभक्तीवर आधारित गाण्यांवर डान्स करताना दिसत आहेत; तर काही जण देशाबद्दलच्या भावना व्यक्त करrत आहेत. सध्या अशा प्रकारचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय; ज्यात एक तरुणी असं काहीतरी करून दाखवतेय, जे पाहून अनेक जण अवाक् झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर कधी कोणत्या गोष्टी व्हायरल होतील ते सांगता येत नाही. काल स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेकांनी विविध पद्धतीने हा दिवस साजरा केला. काही तासांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये मुंबई पोलिसांच्या खाकी स्टुडिओ नावाच्या म्युझिक बॅण्डने स्वातंत्र्य दिनानिमित्त खास सादरीकरण केले, ज्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान, आता एका तरुणीचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये ती तिची ताकद दाखवताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी तिरंगी साडी नेसून भररस्त्यात पुशअप्स मारत आहे. पण, ती मारत असलेले हे पुश-अप्स खूप कठीण आहेत. कारण- यावेळी तिने तिच्या पाठीवर चक्क रिक्षाचे पुढचे चाक ठेवले आहे आणि याच अवस्थेत ती पुश-अप्स मारताना दिसत आहे. या तरुणीची ताकद पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत.

हेही वाचा: ‘कहते है हमको इंडिया वाले…’ गाण्यावर परदेशातील इन्फ्लुएन्सरने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ x(ट्विटर)वरील @Gulzar_sahab या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत नऊ हजारांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने लिहिलेय, “खूप भारी.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “देसी पॉवर.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “हे असं सगळं करून काय उपयोग?”