Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होणारे भयानक व्हिडीओ पाहून कोणाचाही थरकाप उडणं स्वाभाविक आहे. अलीकडे लोक प्रसिद्धीसाठी काहीतरी वेगळं करून लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधलं जाईल, यासाठी अतोनात प्रयत्न करताना दिसतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर केला जातो. आता असाच एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतोय; ज्यामध्ये एक व्यक्ती भल्यामोठ्या अजगराला पकडताना दिसत आहे.
याआधीही साप पकडणाऱ्या व्यक्तींचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत; ज्यात कधी सर्पमित्र अंड्यांचे रक्षण करणाऱ्या नागिणीला पकडताना दिसले होते. तर, कोणी कधी शौचालयात अडकलेल्या सापाला बाहेर काढताना दिसले होते. नुकत्याच व्हायरल होत असणाऱ्या व्हिडीओमध्ये असाच एक सर्पमित्र भल्यामोठ्या अजगरला पकडताना दिसत आहे; जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
हा व्हायरल व्हिडीओ परदेशातील असून, इन्स्टाग्रामवरील @therealtarzann या अकाउंटद्वारे पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक सर्पमित्र मोठ्या अजगराला पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे; पण तो अजगर काही केल्या त्याच्या हातात येत नाही. अनेकदा तो अजगर त्या व्यक्तीला डसण्याचा (चावण्याचा) प्रयत्नदेखील करतो. शेवटी बरेच प्रयत्न केल्यानंतर ती व्यक्ती मोठ्या हुशारीने अजगराचे तोंड पकडते आणि त्याला हातात घेते. हा थरकाप उडविणारा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर सहज काटा येईल.
पाहा व्हिडीओ:
या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्सदेखील करताना दिसत आहेत. ज्यात एकाने लिहिलेय, “सर्पमित्राचं कौशल्य पाहून अजगरही खूश झाला असेल.” दुसऱ्याने लिहिलेय, “किती भयानक अजगर आहे हा.” आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “भाऊ, तू खरंच ग्रेट आहेस.”
दरम्यान, या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत जवळपास ५.४ मिलियनहून अधिक व्ह्युज आणि दीड लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. हा व्हिडीओ शेअर करणारी व्यक्ती अशाच प्रकारचे विविध प्राणी पकडते. त्याचे इन्स्टाग्रामवर ९.६ मिलियन फॉलोअर्स आहेत.