‘भूतदया करा’, ‘प्राणिमात्रांवर प्रेम करा’ अशी वाक्य आपण लहानपणापासून एेकतो. ही वाक्य प्रत्यक्ष जीवनात उतरवण्याची वेळ आली की बहुतेक वेळा आपण दुर्लक्ष करून पुढे निघून जातो. मनाची लाज वाटली तर फार फार तर त्या माणसाला किंवा प्राण्याला तिथल्या तिथे मदत करून पुढे निघून जातो. आपल्याला काय करायचंय? आपण आपल्याला जमेल तेवढं काम केलं ना? आता पुढचं तो पाहून घेईल , अशी कारणं स्वत:ला देत आपण आपला रस्ता पकडतो. पण आफ्रिकेतल्या बोटस्वाना या देशात घडलेल्या एका घटनेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बोटस्वाना हा देश दक्षिण आफ्रिकेच्याजवळ आहे. आफ्रिकेमधल्या अनेक देशांमध्ये असते तशी याही देशात भरपूर प्राणिसंपदा आहे.

या देशात एका हायवेवरून एका ट्रकमधून तिघेजण जात होते. बराच वेळ ट्रक चालवून थकलेल्या या तिघांनी विश्रांती घ्यावी या उद्देशाने ट्रक रस्त्याच्या बाजूला लावला आणि ते ट्रकमधून बाहेर आले. हा परिसर निर्जन होता आणि दुपारच्या रणरणत्या उन्हात दूरदूरवर कोणी दिसत नव्हतं.

अशा वेळी कुठून कोण जाणे पण एक हत्तीचं पिल्लू या तिघांच्या जवळ आलं. अतिशय थकलेल्या अवस्थेत दिसणाऱ्या या पिल्लाबरोबर त्याची आई किंवा त्याच्या कळपातले बाकी हत्ती दिसत नव्हते. अनेक मैल एकटं चाललेलं हे पिल्लू अन्न-पाण्याविना अशक्त झालं होतं.

या पिल्लाची अवस्था पाहून या तिघा ट्रकचालकांनी आपल्याजवळचं पाणी या पिल्लाला पाजलं. त्यानंतर या पिल्लाच्या जिवात जीव आला.

यानंतर हे तिघेही आपल्या मार्गाने पुढे गेले असते तरी त्यांना कोणी बोललं नसतं. पण या पिल्लाला एकटं टाकून त्यांना जाववेना. या पिल्लाला आपल्या ट्रकमध्ये टाकून हे तिघंही त्याच्या आईचा शोध घ्यायला निघाले. आजूबाजूच्या गवताळ प्रदेशात त्यांनी कितीतरी तास शोध घेऊनसुध्दा या पिल्लाची आई त्यांना सापडली नाही. यानंतरही त्या पिल्लाला त्याच्या नशिबाच्या हवाली करत आपल्या रस्त्याने जाणं या तिघांना शक्य होतं. पण तसं न करता त्यांनी या पिल्लाला ‘Elephants without borders’ या हत्तींच्या संवर्धनासाठी उभारल्या गेलेल्या प्रकल्पात नेऊन सोडलं. या सगळ्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झालाय. पाहा हा व्हिडिओ

सौजन्य- फेसबुक

कार्लोस सांटोस, जोहान ग्रोनवेल्ड आणि पीटर राॅसू अशी या तिघा ट्रकचालकांची नावं आहेत. त्यांच्या या कृतीची जगभर वाहवा होतेय. आणि त्यानिमित्ताने वन्यजीव संरक्षणाकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलंय.