एखाद्या महिलेसाठी दोन पुरूष लढताना तुम्ही अनेकवेळा पाहिले असतील. पण दोन पशूंना असे लढताना तुम्ही क्वचित पाहिले असतील. ऐकायला आश्चर्य वाटत असेल ना, पण हे खरं आहे. प्राण्यांमध्ये मादीला इम्प्रेस करण्यासाठी दोन प्राणी एकमेकांशी लढाई करत असतात. नाग सुद्धा नागिणीला मिळवण्यासाठी आपआपसात भांडत असतात. अशा लढाईत जे वरचढ ठरतात मादी त्यांची होते. सिंह हा जंगलाचा राजा मानला जातो. सिंहाचं नाव जरी काढलं तरी भल्याभल्यांच्या अंगाचा थरकाप उडतो. त्याची गर्जना जरी ऐकली तरी जंगालचे प्राणी सैरावरा धावतात. पण हेच सिंह जर एकमेकांना भिडले तर ही लढाई एखाद्या घनघोर युद्धापेक्षाही कमी नसते.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आधीच एका बाजुला उभ्या असलेल्या सिंहाच्या मागे एक सिंहीण लपण्याचा प्रयत्न करते. त्याच्या समोरून एक सिंह येतो. हा दुसरा सिंह सिंहीण ज्या सिंहाच्या मागे लपते त्याच्या दिशेने धावू लागतो. मग या दोन सिंहांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू होते. सिंहीणीसाठी हे दोन सिंह एकमेकांना भिडत होते. दोन सिंह सिंहीणीला मिळवण्यासाठी संघर्ष करत होते. सिंहीणीवर आपलाच हक्क आहे हे दाखवण्यासाठी दोन सिंह एकमेकांना भिडले. बघता बघता दोन सिंहांची तुंबळ लढाई सुरू झाली. जिंकलो तरच सिंहीण मिळणार म्हणून सिंह एकमेकावर तुटून पडले होते. पहिला सिंह दुसऱ्यावर आक्रमण करतो, तर दुसरा सिंह काही मागे हटण्याचं नाव घेत नाही. दोघांमध्ये झटापट होते. या झटापटीत एक सिंह जमिनीवर पडतो.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : बाळाला पाठीवर घेऊन महिला सफाई कामगार करतेय ड्यूटी, याला जिद्द म्हणावे की मजबुरी?
पण गंमत म्हणजे हे दोन्ही सिंह आपसात जेव्हा लढत होते, त्यावेळेस ही सिंहीण जिच्यासाठी हे सिंह एकमेकांच्या जीवावर उठले होते, ती मात्र पळून गेली. तरीही हे दोन सिंह एकमेकांसोबत लढत राहिले.
आणखी वाचा : चक्क पोपटाने महिलेला ‘आई’ म्हणून हाक मारायला सुरुवात केली, दोघांमधील संभाषणाचा हा VIDEO VIRAL
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : कार एका खड्ड्यातून बाहेर काढण्याच्या नादात दुसऱ्या खड्ड्यात गेली, पाहा हा मजेदार VIRAL VIDEO
हा मजेदार व्हिडीओ वाइल्ड अॅनिमल पिक्स नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की आतापर्यंत या व्हिडीओला १.८ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर ६३.५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक देखील केलंय. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. दोन सिंहांमधली संघर्षाची लढाई पहिल्यांदा पाहिली असल्याची भावना देखील काही युजर्सनी व्यक्त केली आहे. तर काही युजर्स म्हणाले, “एका सिंहीणीने दोन सिंहांमध्ये चांगलं भांडण लावून दिलंय”. हा व्हिडीओ पाहायला जितका मजेदार आहे तितक्याच या व्हिडीओवरील प्रतिक्रिया देखील वाचण्यासारख्या आहेत.