viral video of two elephants: सोशल मीडियावर हल्ली प्राण्यांचे व्हिडीओ फार लोकप्रिय होत आहेत. प्राण्यांच्या हालचाली कॅमेऱ्यात टिपल्या जात आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ इतके मजेशीर आणि मनोरंजन करणारे असतात की काही क्षणांतच ते अनेक लोकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळेच सोशल मीडियावर प्राण्यांच्या व्हिडीओची एक वेगळीच हवा असते. सध्या असाच एक हत्तींचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. हत्तींचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असले तरी त्यात ते आपल्या मजेशीर स्टाईलने लोकांना हसवत असतात. मात्र सध्या व्हायरल होत असणाऱ्या व्हिडीओमध्ये दोन हत्ती एकमेकांशी लढताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
दोन विशालकाय हत्तींचं खतरनाक भांडण –
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, जंगलामध्ये दोन हत्तींमध्ये मारामारी सुरू आहे. बराच वेळ दोघांमध्ये जोरदार भांडण होते. दोघेही एकमेकांना खाली ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. जंगलामधील या दोन हत्तींची फायटिंग पाहून तुम्हाला ही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे हे दोन्हीं हत्ती माघार घेण्यास तयार नाहीत. बऱ्याच वेळ या दोघांची फायटिंग सुरू राहते. यात दोन्ही हत्ती एका मोठ्या झाडावर जाऊन आदळतात. हे हत्ती इतके विशालकाय आहेत, की ते झाडाला धडकताच झाडही खाली पडतं.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – Video viral: पालकांनी मुलांना दिलं भन्नाट सरप्राईज; पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
हे संपूर्ण दृश्य कोणीतरी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे. या व्हिडिओला 243k व्ह्यूज मिळाले आहेत.