दिल्लीची लाइफलाइन मानली जाणाऱ्या मेट्रो ही आक्षेपार्ह कृत्य आणि रिल्स तयार करणाऱ्या तरुण तरुणींचा अड्डा झाली आहे. डीएमआरसीच्या वारंवार इशाऱ्यानंतरही लोकांचे मेट्रोमध्ये रील्स बनवताना आणि नाचतानाचे व्हिडीओ समोर येत आहेत. आता पुन्हा एकदा असाच एक व्हिडीओ दिल्ली मेट्रोमधून समोर आला आहे, ज्यामध्ये दोन मुली मेट्रोच्या आत पोल डान्स करताना दिसत आहेत. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मेट्रोमध्ये दोन तरुणींनी केला पोल डान्स
कधी दिल्ली मेट्रोमध्ये बिकिनी घातलेल्या मुलीचा व्हिडीओ समोर येतो, तर कधी मेट्रोच्या आत जोडप्याच्या अश्लील कृत्याचा व्हिडीओ व्हायरल होतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दोन तरुणी अमिताभ बच्चन यांच्या १९७९ साली आलेल्या ‘सुहाग’ या चित्रपटातील ‘मैं तो बेघर हूं’ या गाण्यावर पोल डान्स करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत आणि तरुणींना फटकारत आहेत.
हेही वाचा – मुंबई लोकलमध्ये काकांनी गायले ‘कांटा लगा’, प्रवाशांनी मारले ठुमके; पाहा मजेशीर व्हिडीओ
शिवभक्तांचा व्हिडिओही समोर आला आहे
तसेच मंगळवारी, दिल्ली मेट्रोमधून एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये श्रावण महिन्याच्या सुरुवातीस होणाऱ्या कावड यात्रेला निघालेले शिवभक्त भगवान शंकराच्या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. काही सोशल मीडिया युजर्सने त्यावर निषेध व्यक्त केला तर काही लोक त्यांच्या समर्थनार्थ उभे राहिलेले दिसत आहेत.
मुलीने मुलाला चापट मारली
काही दिवसांपूर्वी दिल्ली मेट्रोशी संबंधित एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये तरुण- तरुणी वाद घालताना दिसत आहे. दरम्यान, मुलगी त्या मुलाला अनेक वेळा कानाखाली मारते आणि त्याच्यावर खूप ओरडते. याबाबत आजूबाजूचे लोक काहीच बोलले नाहीत. यावर सोशल मीडिया युजर्स विचारत आहेत की, मुलीने एवढ्या वेगाने कानाखाली का मारली, मुलाने असेच केले असते तर काय झाले असते?
हेही वाचा – तुम्ही कधी घुबडाचे कान पाहिले आहेत का? Viral Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
डीएमआरसीने रील बनवणाऱ्यांकडून आकारला दंड
डीएमआरसीने मेट्रोमध्ये किसिंग, पोल डान्स, ब्रेक डान्स आणि बिकिनी परिधान करणाऱ्या तरुणी या सारख्या घटनांना तोंड देण्यासाठी आणि रील्स बनवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी त्यांच्याकडून दंड आकारण्याची तरतूद केली आहे. यासोबतच असे करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला होता, मात्र त्यानंतरही मेट्रोमध्ये आक्षेपार्ह कृत्य करणाऱ्यांचे प्रमाण कमी होत नाही.