Lawyers Fighting Video In Delhi: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये बहुतांश व्हिडीओ हे विनोदी स्वरुपाचे असतात. हे व्हिडीओ पाहिल्यावर आपल्या चेहऱ्यावर नकळत हसू येते. तर काही व्हिडीओ पाहून हसून हसून पोट दुखू लागते. अशाच एका विनोदी व्हिडीओची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. हा व्हिडीओ दिल्लीमधील एका न्यायालयाच्या आवारातला आहे अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. व्हिडीओमध्ये एक महिला वकील पुरुष वकीलांशी मारामारी करत असल्याचे पाहायला मिळते.
एबीपी लाइव्हने दिलेल्या माहितीनुसार, पेशाने वकील असलेल्या एका महिलेने पोलिस उपायुक्तांकडे एका पुरुष वकीलाची औपचारिक तक्रार केली होती. तक्रारीमध्ये त्या महिनेने पुरुष वकीलावर छळ, शारीरिक हिंसा आणि धमकावल्याचे आरोप केले. ज्या पुरुष वकीलावर हे आरोप करण्यात आले, त्याचे नाव विष्णू कुमार शर्मा आहे. तक्रार केल्यानंतर दोघेही न्यायालयामध्ये पोहोचले होते. तेव्हा शांतपणे उभ्या असणाऱ्या त्या महिला वकीलावर विष्णू कुमारने अचानक हल्ला केला. पुढे त्या दोघांमध्ये मारामारी सुरु झाली. व्हिडीओमध्ये ते दोघेही एकमेकांना मारताना दिसतात. आसपासचे काही लोक मधस्थी करत दोघांना सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.
महिलेने केले गंभीर आरोप
या प्रकरणाबाबत त्या महिलेने सांगितले की, ‘त्याने (विष्णू कुमार शर्मा) मला घट्ट पकडले. मी स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न करत होते. तो मला सतत मारत होता. मला खूप लागलं आहे, माझ्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत.’ न्यायालयाच्या आवारामध्ये घडलेल्या या घटनेवर त्वरीत चौकशी करुन दोषी व्यक्तीला लवकरात लवकर कायदेशीर शिक्षा करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
@gharkekalesh या ट्विटर हॅंडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ६०,००० पेक्षा जास्त लोकांना पाहिला आहे. या व्हिडीओला लोकांना तुफान प्रतिसाद दिला आहे. एका यूजरने ‘काय वकील बनणार तू..एका महिलेकडून मार खातो आहेस’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्याने ‘आता आपापला खटला त्या दोघांनाच लढावा लागणार’ ही कमेंट केली आहे. या व्हिडीओची क्वालिटी खराब असल्याने आणि व्हिडीओ काढताना कॅमेरा सतत हलवल्याने नेटकऱ्यांनी कॅमेरामॅनची शाळा घेतली आहे.