म्हणायला जगात करोडो, अब्जावधी माणसं आहेत, पण जी माणुसकी माणसाच्या आत असायला हवी, ती खरं तर मोजक्याच माणसांमध्ये आढळते. माणसाने प्रत्येकाशी मग तो गरीब का असेना, सर्वांशी माणुसकीने वागले पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे, इतरांना मदत केली पाहिजे, हा माणुसकीचा अर्थ आहे. यालाच मानवता म्हणतात. निराधार व्यक्तींना आधार आणि भुकेलेल्यांना अन्न देणे हे मानवाचे कर्तव्य आहे. ही मानवतेची सर्वात मोठी ओळख आहे, परंतु आजकाल या सर्व गोष्टी लोकांमध्ये कमीच दिसतात. पण अजुनही माणुसकी जिवंत आहे, असं मोठ्या अभिमानाने सांगता येईल असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओने सर्वांची मनं जिंकली आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटेल, माणुसकी अजून जिवंत आहे. मनही नक्कीच प्रसन्न होईल.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ दोन शाळकरी मुलांचा आहे. हे शाळकरी मुलं म्हणाल फारच लहान पण त्यांनी त्यांच्या कार्यातून लोकांना मोठा संदेश दिला आहे. लहान मुलं अनेकदा त्यांच्या मोठ्यांकडून खूप काही शिकतात. पण, कधी कधी लहान मुलं असं काही करतात की मोठे मंडळी सुद्धा बघून थक्क होतात. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दोन निरागस मुलं एका असहाय महिलेला कशी मदत करत आहेत हे पाहायला मिळत आहे. व्हिडीओ पाहून महिला हातगाडीवर फळे विकत असल्याचे दिसते. एवढंच नाही तर महिलेचे मूलही हातगाडीवर ठेवलेले दिसत आहे. ती महिला गाडी ढकलण्याचा प्रयत्न करताना दिसतेय.
आणखी वाचा : पोपटासोबत व्हिडीओ बनवत होती तरुणी; अचानक डॉगीने केलं असं काही की झाली तारांबळ, पाहा VIRAL VIDEO
पण जमिनीवर उंच भागामुळे तिची हातगाडी वर चढत नसते. ती पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहते. पण तिला यश मिळत नाही. त्यानंतर दोन लहान शाळकरी मुलं तिथे पोहोचतात आणि महिलेला मदत करू लागतात. यानंतर तिघे मिळून हातगाडी वर चढवतात. महिलेने दोन्ही मुलांना खाण्यासाठी केळीही दिली. मुलांनी महिलेला ज्या प्रकारे मदत केली, त्यामुळे लाखो लोकांनी या शाळकरी मुलांवर कौतुकाचा वर्षाव सुरू केलाय.
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : OMG! मच्छिमाराला सापडला १०० वर्ष जुना महाकाय मासा, VIRAL VIDEO पाहून सारेच जण थक्क
हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल की मुलांनी चमत्कार केला आहे. या व्हिडीओतून लोकांना खूप काही शिकायला मिळालं आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. अल्पावधीतच ८२ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर, व्हिडीओला १४ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. त्याचबरोबर युजर्स या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. मात्र, काही लोक त्यावर टीकाही करत आहेत. लोक असे व्हिडीओ जाणूनबुजून बनवतात, असंही काही लोक कमेंटमध्ये लिहीत आहेत.