‘भारतीय शास्त्रीय संगीत’ म्हटलं की आपल्या मनात एक टिपिकल प्रतिमा उभी राहते.एक ग्रेसफुल कुर्ता घातलेला गायक नाहीतर सुंदरशी साडी नेसून आलेली एखादी गायिका आपल्या डोळ्यासमोर येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

त्याचप्रमाणे गिटार म्हटल की एक भसाड्या आवाजात गाणं गाणारा गायक नजरेसमोर येतो. प्रत्येक संगीतप्रकाराला जोडून अशा प्रतिमा आपल्या मनात तयार व्हाव्याचं का? प्रत्येक संगीतप्रकाराचे आपलं आपलं एक वैशिष्ट्य असतं हे निश्चितच. त्याप्रमाणे त्या संगीतप्रकाराच्या सादरीकरणाची एक वेगळी पध्दत असते. त्यामुळे आपल्या मनामध्य एक विशिष्ट इमेज तयार होते.
आता साडी आणि पंजाबी ड्रेसमध्ये कोणी इलेक्ट्रिक गिटार आणि ऱ्हिदन गिटार वाजवतंय असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहण जरा अवघडच आहे. पण नेटवर सध्या हा असा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोन महिला इलेक्ट्रिक गिटार आणि ऱ्हिदम गिटारवर जबरदस्त धून छेडत आहेत. पाहा हा व्हिडिओ

सौजन्य- फेसबुक

या दोघींकडे एरव्ही जर आपण पाहिलं तर या गिटार वाजवतात हे ओळखू येईल का? पण दिसतं तसं नसतं अस म्हणूनच म्हणतात. आपल्याला अगदी आपल्या सोसायटीत भेटतील अशा या दोन महिला वाटतात. संध्याकाळी भाजी आणायला जाताना आपल्याला या दोघी भेटतील असंही या दोेघींकडे पाहून वाटतं. पण या दोघींच्या हातात गिटार द्या आणि कुठलाही काॅन्सर्ट गाजवतील अशी धमक या दोघींमध्ये आहे.

यावेळी मायक्रोसाॅफ्टच्या बिल गेट्स यांचं एक वाक्य आठवतं. तरूणांना उद्देशून ते म्हणतात “तुमचे आईवडील नेहमीच एवढे अनकूल (uncool) नव्हते. तुम्हाला चांगलं जीवन मिळावं म्हणून कितीतरी वर्षं केलेल्या कष्टांमुळे ते आता असे झाले आहेत” वरच्या व्हिडिओमध्ये असलेल्या या दोघी मनाने तर आहेच पण कौशल्यानेही ‘कूल’ आहेत हे मात्र नक्की