Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच विविध विषयांवरील आधारित व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात कधी भयानक थरकाप उडवणाऱ्या व्हिडीओंचा समावेश असतो, तर कधी मनोरंजन करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असे व्हिडीओ काही क्षणांत लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळवतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यात दोन लहान मुली भांडण करताना दिसत आहेत. त्यांच्या या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या जगात अशी एकही व्यक्ती नसेल जी एकदाही भांडली नसेल. काही जण व्यर्थ भांडण करतात, तर काही जण स्वतःच्या हक्कासाठी भांडण करतात. अशा विविध कारणांमुळे भांडण झालेलं आपण पाहतो. आजपर्यंत असे अनेक व्हायरल व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील, ज्यात कधी ट्रेनमध्ये तर कधी गल्लीमध्ये महिला किंवा पुरुष भांडताना दिसले असतील. पण, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन लहान मुली भांडण करताना दिसत आहेत, जे पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका ठिकाणी दोन लहान मुली एकमेकींसमोर उभ्या असून त्या एकमेकांबरोबर भांडताना दिसत आहेत. यावेळी त्या दोघीही एकमेकींना कशावरून तरी जाब विचारताना दिसत आहेत. पण त्या दोघीही तोतऱ्या बोलत असल्याने त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे समजण्यापलीकडचं आहे. परंतु, त्यांच्या बोलण्याचा अंदाजावरून नक्की त्या दोघींमध्ये बिनसल्याचं दिसत आहे. या दोघींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @marathi_comedy_kattta या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओवर आतापर्यंत ५० हजारहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

हेही वाचा: ‘म्हणून मुलीला कधी इम्प्रेस करायला जाऊ नका…’ मुलीला इम्प्रेस करता करता स्वतःच आपटला; VIDEO पाहून पोट धरून हसाल

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “पोलीस स्टेशनपर्यंत येत असेल तर सांगा… फोर्स तयार ठेवायला”, तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “कळलं का कोणाला काय बोलली ती?”, तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “काहीच कळत नाही; पण मजा येतेय बघायला”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “मजेशीर व्हिडीओ.”