Viral video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो. सोशल मीडियावर सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रील्स बनवत असतात. तुम्ही आजकाल अनेक वयस्कर लोकांना देखील डान्स करताना पाहिलं असेल अशाच एका काकांनी हळदीला भन्नाट डान्स केला आहे.हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी व्हिडिओचा आनंद लुटला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेकदा काही गाणी खूप ट्रेंड करतात. मग त्याच गाण्यांवर अनेकजण व्हिडिओ बनवतात. असेच एक गाणे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमावर ट्रेंड होत आहे.तुम्ही पाहिले असेल सध्या मराठी गाणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड करत आहेत. गुलाबी साडी, नऊवारी साडी, झापुकझुपूक, अशी अनेक गाणी सध्या ट्रेंडमध्ये आहेत. अनेकजण यावर डान्स रिल्स बनवत आहेत. यातील एक गाणे सध्या अनेकांच्या पसंतीस पडले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या गाण्यावर व्हिडिओ बनवत आहेत. ‘तांबडी चामडी चमकते उन्हात लका लका’ या गाण्यावर एका काकांनी अजब डान्स केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणे कठीण होईल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक काका लग्नाच्या मांडवात तांबडी-चांबडी या गाण्यावर अजब डान्स करत आहे. विशेष म्हणजे ते काही विचित्र पद्धतीने चेहरा करत आहेत हे पाहून काकांचे सगळे मित्र त्यांची मजा घेत आहेत. एका व्यक्तीने तर काकांच्या कपाळाला चक्क ५०० शी नोट चिटकवली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “है आज कल किस हाल में तू” म्हणत नवरीने स्वत:चीच हळद गाजवली; जबरदस्त डान्सचा VIDEO झाला व्हायरल

काकांचा डान्स व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत असून तो व्हिडिओ shevde_pramod14 या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये,”काका आता थांबत नाही” असे लिहिण्यात आलेले आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर काही दिवसातच व्हिडिओला ४ हजारांपेक्षा अधिचे लाईक्स मिळाले आहे तर हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video uncle dancing on tambdi chambdi marathi song vide goes viral srk