Viral Video: एखादी सुंदर तरुणी आपली प्रेयसी बनून आपल्या आयुष्यात यावी, अशी अनेक तरुणांची इच्छा असते. पण, त्यासाठी तरुणांना प्रेमाची मागणी घालण्यापासून ते नकार पचवण्यापर्यंत अशा अनेक परीक्षांना सामोरे जावे लागते. त्यात क्वचित एखाद्याचे नशीब चांगले निघाले, तर त्याला होकारही मिळतो. पुरुषांच्या आयुष्यात असे क्षण फार कमी येतात; ज्यात समोरून एखादी स्त्री त्यांना प्रपोज करेल. आजपर्यंत सोशल मीडियावर असे व्हिडीओ तुम्ही फार कमी वेळा पाहिले असतील. मात्र, आता असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात चक्क एक सुंदर तरुणी अनोळखी मुलाला फूल देताना दिसतेय.
सार्वजनिक ठिकाणी एखाद्या अनोळखी तरुणीला प्रपोज करणं किंवा फुलं देणं म्हणजेच स्वतःच्या हिमतीची परीक्षा घेण्यासारखं आहे. कारण- समोरची मुलगी प्रपोज करणाऱ्याला मारेल वा आरडाओरडा करून लोकांना गोळा करेल किंवा ती आणखी काही करील वा काय याबाबत काहीच सांगता येत नाही. पण, असंच जर एखाद्या मुलीनं मुलाबरोबर केलं, तर काय होऊ शकतं? हे सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत पाहायला मिळेल.
सोशल मीडियामुळे प्रँक करणाऱ्यांचा ट्रेंड वाढत चालला आहे. त्यामध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या विविध वयोगटांतील लोकांची ते मस्करी करताना दिसतात. अशी मस्करी अनेकांना खळखळून हसवते, तर अनेकांना घाबरवते. तसेच या प्रँकमुळे प्रँक करणाऱ्या व्यक्तीला मारदेखील खावा लागतो, तर काही प्रँक एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आनंदही घेऊन येऊ शकतात. सध्या व्हायरल होत असलेला या व्हिडीओतील तरुणी तरुणाबरोबर प्रँक करीत असल्याचे म्हटले जात आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका मेट्रोमध्ये एक तरुण मोबाईलमध्ये व्यग्र असून, एक सुंदर तरुणी त्याच्या बाजूला येऊन बसते आणि तिच्या हातातील फूल हळूच त्याला देण्याचा प्रयत्न करते. तरुणी आपल्याला फूल देत असल्याचे कळताच तो इकडे-तिकडे पाहू लागतो. नंतर तो पटकन तिच्या हातातील फूल घेऊन लाजतो आणि तिला थँक्यूदेखील म्हणतो. त्यानंतर तरुणी पुढच्या स्टेशनवर उतरते. यावेळी तो तरुण एकटक तिच्याकडेच पाहत राहतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @rj.mahvash या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत ६२ दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि चार दशलक्षांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्याशिवाय अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “त्याला फूल दिलंय; पण सगळे पुरुष खूश आहेत.” आणखी एका युजरनं लिहिलंय, “हा क्षण तो आयुष्यभर विसरणार नाही.” आणखी एकानं लिहिलंय, “प्रँक असला तरी खूप छान आहे व्हिडीओ.”