भारतीय त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी आणि त्यांच्या जुगाडवरील प्रेमासाठी ओळखले जातात. सोशल मीडियावर रोज एकापेक्षा एक भन्नाट कल्पना शोधून हटके जुगाडचे अनेक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळवतात. नुकतेच उत्तर प्रदेशातील दोन भावंडानी चक्क एका मारुती सुझुकीच्या WagonR कारचे जुगाड करून हेलिकॉप्टरमध्ये रूपांतर केले आहे. देसी जुगाडने नेटकऱ्यांचे आणि पोलिस अधिकाऱ्यांचेही लक्ष वेधून घेतले.

कारकॉप्टरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक्सवर ‘priyarajputlive’ हँडलवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगरच्या रस्त्यावरू दोन भाऊ त्यांच्या अनोख्या कारकॉप्टरची निर्मिती करताना दिसत आहेत.व्हिडीओमध्ये पाहू शकता की हेलिकॉप्टर प्रमाणे कारच्या मागच्या बाजूला शेपटी जोडली आहे तर छतावर पंखा बसवला आहे. त्यांच्या कल्पक दृष्टिकोनाने अनेकांना प्रभावित केले आहे. व्हिडिओ हजारो लोकांना पाहिला असून अनेकानी क्रिया मिळाल्या. पण, यूपी पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांचे तात्पुरते हेलिकॉप्टर ताब्यात घेतल्याने त्यांच्या नवकल्पनाचा आनंद अल्पकाळ टिकला. आपल्या कार कॉप्टरला रंगवण्यासाठी निघाले होते पण त्या आधीच पोलिसांनी कारवाई केली.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Lamborghini Catches Fire
Lamborghini Fire : मुंबईतील कोस्टल रोडवर ‘लॅम्बोर्गिनी’ला आग; उद्योगपती गौतम सिंघानियांनी Video केला पोस्ट
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
What is ‘flying naked’ (2)
Flying naked नवीन ट्रॅव्हल हॅक; तुम्ही हा ट्रेण्ड स्वीकारणार का?
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
butibori flyover latest marathi news
गडकरींच्या जिल्ह्यातील उड्डाण पूल खचला, एक किमी वाहनांच्या रांगा

हेही वाचा – K-Popसाठी त्यांनी घर सोडलं, पण…मुर्शिदाबादमध्ये त्यावेळी काय घडले?

व्हिडीओ पाहा

कारकॉप्टर तयार करण्यासाठी या दोन भावडांच्या सर्जनशीलतेबद्दल आणि पोलिसांच्या हस्तक्षेपाबद्दल नेटकऱ्यांनी समिश्र प्रतिसाद दिला. “राज्य सरकारने त्यांच्या प्रयोगांसाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून द्यावी,” “असे सुचवून काहींनी या नव्याने काहीतरी घडवून पाहण्यांऱ्याना मान्यता आणि समर्थन देण्याची मागणी केली. तर काही स्वदेशी जुगाडची आणि लोकांच्या कलागुणांची कदर नसल्याबद्दल आणि भारतातील नवनिर्मितीबाबतच्या कठोर कायद्याबाबत नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा –Viral video: प्राणीसंग्रहालयात सिंहाबरोबर रस्सीखेच खेळतोय हा व्यक्ती! कोण जिंकलं ते व्हिडीओमध्ये बघा


व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना एकाने लिहिले “दोन्ही भावांना सन्मानित केले पाहिजे.”

दुसरा म्हणाला“मी राज्य सरकारला विनंती करतो की, त्यांना त्यांचा हा शोध सुरक्षित ठिकाणी वापरण्याची परवानगी द्यावी,”

तिसऱ्याने लिहले. “जिथे पोलिस सक्रिय असले पाहिजेत, तिथे ते झोपतात; जिथे लोकांची कौशल्ये समोर आणण्यास मदत केली पाहिजे, तिथे कारवाई करतात,”

चौथ्याने लिहिले “ते परदेशी असते तर या लोकांना बक्षीस मिळाले असते, पण मित्रांनो, अशा कायद्यामुळे आपण अडचणीत येत आहोत. जर आम्ही आमचे कौशल्य दाखवले तर आम्ही तुरुंगात जाऊ.”

Story img Loader