साधारणपणे विहिरीतून पाणी येतं, पण विहिरीतून साप बाहेर पडतात, पाणी नाही असे जर कोणी म्हटले तर? हे ऐकून माणसाला हसू येईल. पण विश्वास ठेवा, उत्तर प्रदेशमध्ये अशी एक विहीर आहे जिथे अचानक सापांचा संसार आढळला. तोही एक-दोन नव्हे तर सहा सापांनी भरला असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये पाण्याबरोबरच विहिरीत साप स्पष्टपणे दिसतात. ही खोटी कथा नसून सत्य आहे. गावातील लोक ज्या विहिरीतून पाणी घेत असत त्या विहिरीत अचानक मोठ्या प्रमाणात साप दिसू लागल्याने येथील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. अहवालानुसार, उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर जिल्ह्यात एक जुनी विहीर आहे, जिथून गावकरी पाणी काढतात. अचानक या विहिरीत सहा साप पाहून ग्रामस्थ घाबरले. विहिरीत साप असल्याची बातमी जंगलात आगीसारखी पसरली. ज्या विहिरीत सहा साप दिसत आहेत, ती विहीर पाहण्यासाठी लोक गर्दी करू लागले.

Alone tiger attacks a herd of wild gaur
‘जेव्हा वाघ जगण्यासाठी झटतो…’ एकट्या वाघाचा रानगव्याच्या कळपावर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Fossil footprints show life on earth
कुतूहल : खडकांवरच्या पाऊलखुणा
Chandrapur District , Junona Ballarpur route, tiger ,
VIDEO : जेव्हा जंगलाचा राजा आला रस्त्यावर…
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
nylon manja news in marathi
अकोल्यात नायलॉन मांजामुळे डोळाच धोक्यात… प्रशासनाच्या नाकावर टिच्चून…
makar sankranti birds emotional video
“पतंग नवीन खरेदी कराल; पण त्यांच्या जीवाचं काय?” मकर संक्रांतीचा ‘हा’ आनंद कोणाला तरी कायमचं दुख देऊन जातोय; पाहा हृदयद्रावक video
elephant doing a headstand video
खाली डोके, वर पाय….चक्क शीर्षासन करतोय ‘हा’ हत्ती! Viral Video पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

आणखी वाचा : VIRAL VIDEO : अमेरिकेची सर्वात मोठी स्लाइड मुलांना हवेत फेकत होती, सुरू होऊन चार तास बंद करावी लागली

उत्तर प्रदेशातील साप पकडणारा मुरलीवाले हौसला हा एक धाडसी तरुण आहे जो धोकादायक साप पकडण्यासाठी ओळखला जातो. तो अनेकदा सापांना वाचवताना व्हिडीओ रेकॉर्ड करतो आणि त्याच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करत असतो. नुकतेच त्याने उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर जिल्ह्यात जुन्या विहिरीतील सहा सापांची सुटका करताना पुन्हा एकदा धैर्य दाखवले.

आणखी वाचा : दुधाने मुलीचे पाय धुतले आणि तेच दुध प्यायले, बाप-लेकीच्या नात्याचा हा गोंडस VIRAL VIDEO पाहाच

यूट्यूबवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हौसला दोरी आणि शिडी वापरून विहिरीत उतरताना दिसत आहे. खाली उतरल्यानंतर तो सर्व सहा सापांना चतुराईने पकडतो. यात दोन किंग कोब्रा, दोन रसेलचे वाइपर आणि इतर दोन विषारी साप आहेत. यावेळी हे साप त्याच्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर तो त्यांना कापडी पिशवीत घेऊन सुरक्षितपणे जंगलात सोडतो. त्याला सापांची सुटका करताना पाहण्यासाठी विहिरीभोवती जमलेल्या गावकऱ्यांनी तरुणाच्या धाडसी कृत्याचे कौतुक केले.

आणखी वाचा : इवल्याश्या मुंग्यांनी चक्क काठी हलवली, हा VIRAL VIDEO एकीचे बळ दाखवतो…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : मेट्रोत चिमुकलीचा GOMI-GOMI गाण्यावर जबरदस्त डान्स, VIRAL VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ‘मागे वळून तर पाहा’

याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओला आतापर्यंत व्हिडिओला ७ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाखांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

Story img Loader