अमेरिका देशात पुराचे आस्मानी संकट कोसळलंय. या पूराचा फटका येथील जनजीवनावरही बसला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. अमेरिकेत सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे येथील रस्त्यांना नद्यांच स्वरुप आलेय. या पुरामुळे वाहतूक व्यवस्थाही कोलमडून गेली आहे. अशाच अमेरिकेतल्या पुराची भीषणता दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमध्ये एक महिला पुराच्या पाण्यात कारमध्ये अडकलेली दिसत आहे. कार वाहून जात असल्याने पूर किती मोठा होता आणि पाण्याचा वेग किती होता याची कल्पना सुद्धा आपण करु शकत नाही. पुराच्या पाण्यात कारमध्ये अडकलेल्या महिलेला रेस्क्यु ऑपरेशन सुरू असल्याचं दिसून येत आहे. महिलेला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणणारे हे अमेरिकन पोलीस एखाद्या हिरोपेक्षाही कमी नाहीत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या हा व्हिडीओ अमेरिकेतल्या अॅरिझोना परिसरातला आहे. या ठिकाणी पुराच्या पाण्यात ही महिला कारमध्ये अडकून पडली होती. याची माहिती मिळताच तिथले पोलीस घटनास्थळी दाखल होत तिच्या रेस्क्यु ऑपरेशनसाठी धडपड करू लागले. या व्हिडीओमध्ये एक पोलीस अधिकारी पुराच्या पाण्यात अडकलेल्या लाल रंगाच्या कारमध्ये अडकलेल्या महिलेशी बोलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. बचावादरम्यान अधिकारी महिलेला बाहेर येण्यास उद्युक्त करताना ऐकू येत आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने ही महिला कारसोबत वाहून जाऊ नये म्हणून ते पिवळी दोरी घेऊन वाहनाभोवती गुंडाळतानाही दिसतात. पाण्याचा वेग इतका जास्त होता की, पोलिसांनाही आपलं संतुलन कायम ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागला. मात्र ते हळूहळू या महिलेला कारमधून बाहेर काढण्यात यशस्वी ठरले. ही महिला पोलिसांना तिच्यासोबत असलेल्या कुत्र्याबद्दल सांगताना दिसतेय. अधिकार्यांनी कुत्र्याला सुद्धा वाचवण्यासाठी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, पण यात ते अयशस्वी ठरले. या महिलेचा जीव वाचला पण तिचा कुत्रा तिच्यासोबत नाही, याचं तिला दुःख आहे.
आणखी वाचा : माकडाला जादू दाखवायला निघाला, मग पुढे जे घडतं त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पाहा हा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : TMC च्या Mahua Moitra आणि त्यांची ‘Luis Vitton Bag’ ट्विटरवर करतेय ट्रेंड, वाचा मजेदार ट्विट
या बचावकार्याचा व्हिडीओ एजे पोलीस विभागाने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. या बचाव कार्यात दोन अधिकारी, एक अटक अधिकारी आणि एक मेसा अग्निशमन दलाचा जवान सहभागी होते. इथल्या नागरिकांनी या महिलेबाबत माहिती पोलिसांना दिली होती. ही घटना २८ जुलै रोजी घडली होती. अमेरिकामधील पूरस्थिती किती भयंकर आहे हे दाखवणारा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात शेअर करू लागले आहेत.