Viral Video: ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ असं आपण म्हणतो. पण, हल्ली समोर येणाऱ्या अनेक घटनांमुळे आईदेखील मुलांची शत्रू होऊ शकते यावर तुमचा विश्वास बसेल. आईच्या प्रेमाची भूक प्रत्येक लेकरामध्ये असते. आईने आपल्याला जवळ घ्यावं, जीव लावावा असं प्रत्येक लहान मुलाला वाटतं. त्याच्या आयुष्यातील हे क्षण असे असतात, ज्यात त्याला आईचा सहवास सर्वात जास्त वेळ लाभतो. परंतु, कधी कधी काहींना हे सुख अनुभवायला मिळत नाही. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.
जन्मापासून प्रत्येकालाच आई-वडिलांचा सहवास आणि प्रेमाची ओढ असते. आई-वडिलांकडून मिळालेले प्रेम, शिकवण लहानपणापासूनच मुलांच्या आयुष्यावर प्रभाव टाकते. परंतु, अनेकदा काही बेजबाबदार पालक मुलं जन्माला घालतात, पण त्यांच्यात त्यांना सांभाळायची मानसिकता नसते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका बेजबाबदार आई-वडिलांनी पोटच्या लेकराला रस्त्यावर सोडून दिल्याचे दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रात्रीच्या वेळी बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येताच काही स्थानिक रहिवासी मोबाइल टॉर्चच्या मदतीने आवाजाच्या दिशेने शोध घेतात. यावेळी त्यांना एका कोपऱ्यात हे बाळ निर्वस्त्र अवस्थेत दिसते, तसेच यावेळी त्या नवजात बालकाच्या तोंडावर प्लास्टिकची पिशवीही गुंडाळण्यात आली होती. ही घटना पुण्यातील वडगाव येथील असल्याचे म्हटले जात आहे. शिवाय हे कृत्य त्याच्या जन्मदात्या आईने केल्याचे हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने म्हटले आहे. पोलिस या बाळाच्या आई-वडिलांचा शोध घेत असून हे बाळ अनैतिक संबंधातून झाल्याचाही अनेकजण संशय व्यक्त करत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @marathi_news0 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास पाच लाखांहून अधिक व्ह्युज आणि चार हजारांहून अधिक लाइक्सही मिळाले आहेत. त्याशिवाय अनेक नेटकरीही यावर अनेक कमेंट्स करीत आहेत. एकानं लिहिलंय, “आई ग….कशी बाई आहे…शब्दच नाही बोलायला…आई नावाला कलंक आहे ती बाई” दुसऱ्यानं लिहिलंय, “अरे ज्यांना नाही त्यांना तरी द्या.” तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “किती मूर्ख बाई असेल, देवालापण घाबरत नाही”