महाकुंभमेळ्यात चहा विकून किती पैसे कमवता येतात? हे जाणून घेण्यासाठी, एका कंटेंट क्रिएटरने अलीकडेच कुंभमेळ्याच्या परिसरात चहाचा स्टॉल चालवण्याचे आव्हान स्वीकारले. चहा व्यतिरिक्त, त्याने पाण्याच्या बाटल्या देखील विकल्या. जगातील सर्वात मोठा मेळावा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महोत्सवात लाखो लोक उपस्थित असल्याने, अन्न आणि पेय पदार्थांची मागणी खरोखरच जास्त आहे. हे सांगण्याची गरज नाही की, विक्रेत्यांना नफा कमावण्याची उत्तम संधी निर्माण होते.
महाकुंभमेळ्यात चहा विकून किती नफा कमावू शकता?
कंटेंट क्रिएटर (@madcap_alive) ने इंस्टाग्रामवर त्याचा अनुभव शेअर करताना व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये तो लोकांना प्रति कप १० रुपयांनी चहा देताना दिसतो. तो महाकुंभमेळ्यात चहाने भरलेला एक मोठा डबा आणि डिस्पोजेबल कप घेऊन येणाऱ्या जाणाऱ्यांना चहा देत फिरतो. दुपारी २ वाजेपर्यंत मागणी कमी झाली. पण संध्याकाळी चहाची मागणी चांगलीच वाढली. दिवसाच्या शेवटी, व्लॉगरला हे पाहून आश्चर्य वाटले की”त्याने ७, ००० रुपये कमावले आणि ५, ००० रुपयांचा चांगला नफा झाला.”
नेटकऱ्यांनी केल्या मजेशीर कमेंट्स
या व्हिडिओला १.३५ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये लगेचच प्रतिक्रिया येऊ लागल्या:
“१ दिवस ५, ००० रुपये नफा कमावत असेल तो १ महिन्याचा १, ५५, ००० रुपये कमावू शकतो.” असे अंदाज एका वापरकर्त्याने मोजले.
“हा एक व्यवसाय आहे, ” दुसऱ्याने निदर्शनास आणून दिले. “प्रयागराजमध्ये आपले स्वागत आहे भाऊ, ” अशी कमेंट एकाने केली.
एका व्यक्तीने कंटेंट क्रिएटरला “कुंभ चहावाला” म्हटले, जो आता व्हायरल झालेल्या चहा विक्रेत्या डॉली चहावाला यांचा संदर्भ देत होता, ज्याने बिल गेट्सना चहा देखील दिला होता.
एक विनोदी कमेंट केली होती, “भाऊ मला अभ्यास सोडण्यास प्रेरित करत आहेत.” अशाच भावना व्यक्त करताना, एक व्यक्ती म्हणाला, “शिक्षण हा एक घोटाळा आहे.”
“एका सामान्य अभियंत्याचे मध्यरात्रीचे विचार, ” एका व्यक्तीने उपहासाने म्हटले. “महाकुंभमेळ्यादरम्यान १० दिवस चहा विकण्याचे आव्हान, ” असे दुसऱ्याने सुचवले.