Video viral: कर्नाटकाच्या विधानसभेत एका आमदाराने मोबाईलवर ब्ल्यू फिल्म पाहिल्याचं प्रकरण चांगलच गाजलं होतं. मात्र, हे प्रकरण एका व्यक्ती पुरतं मर्यादित असलं तरी विधानसभेत हा प्रकार घडल्याने ते प्रकरण गंभीर होतं. त्यानंतर बिहारची राजधानी पटना रेल्वे स्टेशनचा एक व्हिडिओ गेल्या महिन्यातच व्हायरल झाला होता, जिथे प्लॅटफॉर्मवरील टीव्ही स्क्रीनवर अचानक एक अश्लील व्हिडिओ सुरू झाला. दरम्यान पाटण्यातील या अश्लील व्हिडिओच्या घटनेनंतर आता भागलपूरमधून एका अश्लिल मेसेजचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
बिहारमधील भागलपूर येथे आंबेडकर यांच्या पुतळ्याच्यावर लावलेल्या डिजिटल स्क्रीनवर आक्षेपार्ह संदेश दिसला, यानंतर भागलपूर येथील स्टेशन चौकात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे स्क्रीनवर बराच वेळ हे सुरु होतं. ‘सेक्स वर्करसाठी येथे संपर्क करा’ असे या स्क्रीनवर लिहिले होते. मात्र ही अश्लील जाहिरात पाहून तेथे उपस्थित लोक भडकले आणि त्यांनी तत्काळ चौकात तैनात असलेल्या पोलिसांना याची माहिती दिली, त्यांनी ही जाहिरात तात्काळ थांबवली. तोपर्यंत कोणीतरी ही घटना रेकॉर्ड करून सोशल मीडियावर अपलोड केली होती, ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
अश्लिल व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा – बिकिनीमध्ये फोटोशूट करण्यासाठी ती उभी होती, फोटोग्राफरने केलं असं काही की…Video पाहून होईल हसू अनावर
जवळपास १० ते १५ मिनिटे डिजिटल स्क्रीनवर हा अश्लील मेसेज येत राहिला. डिजिटल स्क्रीन बंद झाल्यानंतर घटनेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. यानंतर एसडीएम धनंजय कुमार, शहर डीएसपी अजय चौधरी यांच्यासह कोतवाली पोलिस स्टेशन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी प्रकरणाची दखल घेतली, तसेच तेथून स्क्रीन काढून जप्त केली.