Viral Video: “तू फक्त साथ दे, अख्खं आयुष्य सुंदर बनवू”, असं म्हणणारा जोडीदार प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात हवा असतो. खरंच प्रेम ही एक खूप सुंदर आणि निर्मळ भावना आहे. प्रेम केवळ अपेक्षा पूर्ण करणं नसून एकमेकांच्या सुख-दुःखांत एकमेकांना साथ देणं, परिस्थिती समजून घेणं, कधीतरी आपल्या जोडीदारला एखादी गोष्ट आवडते म्हणून त्याच्यासाठी ती आवडीनं करणं, याला खरं प्रेम म्हणतात. दरम्यान, आता एक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात एक पती-पत्नीची जोडी आयुष्यातील सुंदर क्षण जगताना दिसत आहे.

लग्न करण्यासाठी जोडीदार निवडताना मुला-मुलींच्या एकमेकांकडून खूप अपेक्षा असतात; ज्यामुळे बऱ्याचदा ठरलेलं लग्नही मोडतं. या सर्व गोष्टींमुळे हल्ली प्रेम आणि लग्न हे फक्त अपेक्षा पूर्ण करण्याचे साधन झाल्याचे म्हटले जाते. पण, अशा गोष्टी सर्वांच्या बाबतीत सारख्या नसतात. अनेकदा एखाद्या व्यक्तीकडे काही नसतानादेखील त्याला मनापासून प्रेम करणारी व्यक्ती भेटते. असेल त्या परिस्थितीत ती व्यक्ती आपल्या जोडीदाराची साथ देते. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

हेही वाचा: ‘त्या श्वानाचा इतका तिरस्कार का?’ भररस्त्यात वृद्ध व्यक्तीने लावला श्वानाला गळफास; घटनेचा थरारक VIDEO पाहून संतापले नेटकरी

पाहा व्हिडओ:

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका रस्त्यावरून सामानाने भरलेला छोटा टेम्पो जात असून यावेळी त्या टेम्पोमध्ये पती-पत्नी बसल्याचे दिसत आहे. यावेळी घर शिफ्ट करणारे हे जोडपे एकमेकांच्या हातात हात घालून प्रेमाने गप्पा मारताना दिसत आहे. असेल त्या परिस्थितीत दोघेही एकमेकांना सांभाळून घेत आहेत हे पाहून नेटकरही त्यांच्या प्रेमाचे कौतुक करीत आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @official_vishwa_96k या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत अनेक व्ह्युज आणि लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

Story img Loader