मुंबईत घर घेणे हे प्रत्येक मुंबईकराचे स्वप्न असते. पण, मुबंईतीतल्या घरांच्या वाढत्या किमती पाहता, अनेकांचे हे स्वप्न अपूर्ण राहते. भाड्याने घर घ्यायचे म्हटले तरी प्रत्येक मुंबईकराला टेन्शन येते. पण, अलीकडेच मुंबईतील कांदिवली परिसरात केवळ ३२३ चौरस फूट परिसरात बांधलेला टू बीएचके (2BHK) फ्लॅट दाखविणारा होम टूर व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मुंबईत कांदिवली इथे एक रिअल इस्टेट इन्फ्लुएन्सर ३२३ चौरस फूट घराचा एक व्हिडीओ दाखवते. कांदिवलीमधील एका २३ मजली इमारतीत फक्त ७५ लाख रुपयांमध्ये हा फ्लॅट उपलब्ध आहे, असे ती सांगते. ही तरुणी व्हिडीओत सांगते की, तुम्ही टू बीएचके फ्लॅट शोधत असाल. पण, तुमचे बजेट वन बीएचके खरेदी करण्यासारखे असेल. तर तुम्ही हा फ्लॅट खरेदी करू शकता. कारण- या फ्लॅटची रचना टू बीएचकेसारखी करण्यात आली आहे.

Mumbai zopu yojana loksatta news
घर मिळालेल्या झोपडीवासीयांच्या नावे पुन्हा पात्रता! घोटाळा उघड होऊन वर्षभरानंतरही कारवाई नाही
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Municipal corporation takes action against illegally construction debris in Borivali
बोरिवलीत अनधिकृतपणे राडारोडा टाकणाऱ्यांवर पालिकेची कारवाई
BKC Missing Link Open for Traffic
बीकेसी मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुला, पूर्व द्रुतगती महामार्ग ते बीकेसी प्रवास वेगवान
Ministers Bungalow News
Ministers Bungalows : धनंजय मुंडेंना ‘सातपुडा’, पंकजा मुंडेंना ‘पर्णकुटी’ वाचा कुठल्या मंत्र्याला मिळाला कुठला सरकारी बंगला?
Navi Mumbai Police detained four Bangladeshi nationals living in rented room on Saturday
खारघरमध्ये चार बांगलादेशीय नागरीक ताब्यात
Navri Mile Hitlarla
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’मधील एजे-लीलाच्या रोमँटिक सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Multi storey high security prison in Mumbai news
मुंबईत बहुमजली अतिसुरक्षित तुरुंग

हेही वाचा…तरुणाने Zomato वरून मागवला केक! नाव लिहिताना केली ‘ही’ चूक आणि मग… पाहा मजेशीर पोस्ट

व्हिडीओ नक्की बघा :

व्हिडीओमध्ये सगळ्यात पहिला हॉल दाखवते. त्यामध्ये सोफा, टीव्ही व एका बाजूला एल आकारात एक छोटेसे स्वयंपाक घरसुद्धा तयार करून घेतलेले असते. तसेच नंतर ती व्हिडीओत दोन लहान बेडरूम्स दाखवते; ज्यामध्ये दोन बाथरूमही असतात. तर, एका बेडरूममध्ये फक्त सोफा ठेवण्यापूर्ती मर्यादित जागा असते. पण, एकंदरीतच वन बीएचके फ्लॅटमध्ये अगदीच खास पद्धतीत टू बीएचकेची रचना करून घेतलेली दिसते.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @systemstrader1 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओला ‘फक्त मुंबईत रिअल इस्टेटमध्ये हे शक्य आहे. ‘३२३ स्क्वेअर फुटांमध्ये २ बीएचके’, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. काही नेटकरी हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त करीत आहेत. तर, एका युजरने घराच्या रचनेची खिल्ली उडविताना ‘३२३ चौरस फूट परिसरात गावी फक्त गाय आणि म्हैस राहतात’, अशी कमेंट केली आहे.

Story img Loader